संवर्धणाची भाषा शाळेत शिकत होत मी अ , आ आणि आई वेळ बदलला काळ लोटला लागली सर्वांना विकासाची घाई II १ II लहान होतो तेव्हा चंद्र होता मामा आणि चिव चिव करणारी चिउताई आता मोठा झालो मी फार तेव्हा समजले चंद्र तर अप्रकाशित दगडी भार II २ II जोतिबा आणि सावित्री ने ज्ञान गंगोत्रि दावली शिक्षणाची दारे सारी गावोगावी उघडली आता आले आहेत थ्रिजी आणि फोरजी मुल आणि पाल्य सर्व त्याच्यातचं बिजी II ३ II ‘ भाषा ’ असते अभिव्यक्तीसाठी हे तर सर्वजण विसरलेत माझ्या भारत भूमीत सर्व चौकटी त डांबलेत ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेंट चेंज ची सर्वत्र चर्चा सत्रे गावचा खेडूत आजही येथे देवराई च्या विचार गात्रेत II ४ II आमची म्हातारी आज ही शेतात देशी बियाणे जपते नको संकर पर बियांचं म्हणून मातीत ती खपते नाही भाषा त्यांना अवगत इंग्लंडच्या त्या महाराणीची परंतु कळते नागपंचमी आणि पोळा ही व्रते चिरंतन निसर्गाची II ५ II अहो साहेब इंग्रजी बीइंग्रजी ठीक आहे जागतिकी करणासाठी म...
Posts
Showing posts from January 21, 2020