मा सेमारी आणि संरक्षित समुद्री मासे - Rhynchobatus djiddensis गोष्ट आहे एका भटकंतीची ध्येयाणे भाराऊण जेव्हा आपण प्रयत्न करत असतो यश मिळवण्यासाठी तेव्हा आपणास काही अनपेक्षीत अनुभव प्राप्त होतात.असा एक अनुभ जो आपणास विचार करायाला भाग पाडतो. नववर्षा च्या सुरूवातीलाच एक ध्येय ठरवून मी माझे दैनदिंन जीवन सुरू केल होत. त्यातील एक ध्येय होत ज्या समाजात मी वाढलो त्या समाजातील आताचे प्रश्न आधुनिक समुद्री विज्ञानाच्या नजरेतूण पाहणे. जानेवारी २०१८ चालू होत भल्या पहाटेच घरून भाऊच्या धक्यावर गेलेा. सर्वत्र एकच गोंधळ आणि कल्लोल चालू होता. माणसे आणि मासे यांच्यात जणू स्पर्धा रंगली होती. चांदेरी मासे सूर्याच्या कोवळया उन्हात चमकत होते आणि त्याच बरोबर चांदेरी रूपेरी दागिने घातलेल्या कोळणी आपल्या उत्साहात बाजार करत होत्या. माणसाच्या या कोलाहलात वाट काढत मी आत शिरत होतो . कुठेतरी पडून राहलेले पाकट आणि कुठेतरी चालू असलेला मावऱ्याचा लिलाव यांनी जणू वातावरण ढवळूण निघत होते. तेवढयात माझ्या नजरेसमोर आला असा एक ओलखीचा आकार सोंडाल अर्थात ...