Posts

Showing posts from 2023

मुरलेली वाईन _

Image
    मुरलेली वाईन  कधीतरी अचानक एखादी आठवण काट्या टोचल्या सारखी सळते  कळत नाही त्या क्षणी हे काय आणि कश्याच शल्य उरी दाटून आलं आहे   II१II बऱ्यावेळा ही आठवण नयनी अश्रू देते आणि ह्रदयचे ठोके वाढवते  पण कधी तरी या स्मरणीका ओठांवर अलगद हसू देऊन जातात  II२II शेवटी असू काय नी हसू काय दोन्ही माझ्या सख्या सोबती आहेत  भेद इतकाचं आहे पहिली बहुधा रोज भेट देते, दुसरी मात्र आजकाल अंतर राखते  II३II आता माझं वाढलेल वय माझ्या शरीरावर दिसत आहे जणु मला ते सांगत आहे कि मित्रा आता गाडी उरतनीला लवकर लागेल  II४II  माझे हे शब्द कोणाला कदाचित आवडणार नाही वाढत्या वयाबद्दल  पण खरं तर हेच आहे वाढणार वय चेहऱ्यावर आणि वृत्तीचं तारुण्य ह्रदययावर  II५II नवीन स्पर्श, बेभान भावना आजकाल उरी पिंगा कमी घालतात  कदाचित वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि मुरलेली नाती त्यांना अवरोध करतात  II६II माहित असतं मला ही, कि ही संधी पुन्हा येणार नाही कदाचित  पण काय करावं स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि निष्ठा गाफिल नाही होऊन देत  II७II जशी जुनी झालेली वाईन अधि...

गोष्ट तिच्या अस्मितेची

Image
  'ती' ला समजून घेताना      माहीत नाही किती वेळ झाला असेल कि 'ती' माझ्या साठी धडपड करत असते. ती रोज सकाळी माझ्या साठी आणि कळत नकळत ज्यांना मी माझं म्हणतो त्या सर्वांसाठी भल्या पहाटे उठते. कधी काही खाऊन कधी उपाशीपोटी घराचा उंबरा ती ओलांडून घरा बाहेर पडते. ती हे सगळं काही सातत्याने आणि जिद्धीने करत असते यांचा अर्थ असा नाही कि तिला भीती वाटत नाही किंवा ती थकत नाही. तिला थोडी भीती असते, बहुधा ती थकते देखील पण तरी देखील ती हे सगळं करत असते. तिने माझ्या पेक्षा अधिक मेहनत करून (तब्बल दोन वर्ष दिवसाला 10-12 तास अभ्यास केला ) वर्ष 2017 मध्ये भारतातून कोणत्या ही जातीत जन्मलो म्हणून आरक्षण न घेता 50 वा क्रमांक पटकवलं. गेल्या चार वर्षात तिने निव्व्ळ माझ्या प्रेमा आणि सोबती साठी स्वतःचं करियर मध्ये ब्रेक घेतला.    सध्या तिची फार चिडचिड होते, ती बरीच दमते, तिला जे खायला आवडते असं खान पण ती कधी तरीच खाते. कधी घरातले कधी बाहेरचे तिला प्रोत्साहित करतात तर कधी तिला दुषण लावतात. पण माझ्या सगळ्या मित्रानो (विशेषतः ज्यांना आपण 'पुरुष' आहोत अश्या विशेष अहंकार असणाऱ्या मंडळी) हो ...

प्रवास चिंतन

Image
  जेव्हा नदी सागराला गोष्ट सांगते    गेल्या काही दिवसांपासून बराच प्रवास झाला. नवीन गोष्टी, नवीन व्यक्ती, नवीन ठिकाण सोबत जेथे गेलो तेथली बोलीभाषा आणि पारंपरिक व्यवसाय अनुभवले. जवळपास १३०५ किमी अंतर गाडीने पार केलं तर ५० किमी पेक्षा अधिक अंतर पाई चाललो. यादरम्यान ३२ हून अधिक पक्षी प्रजातीची नोंद करता आली याचा मला कमालीचा आनंद झाला. ताम्रपर्णी आणि कुंडलीका या नद्यांच्या काठी वसलेली गाव आणि खेडी पहिली. जीवनात सुंगध भरेल असे हे सारं काही.    या सगळ्या अनुभवाचं चिंतन केल्यानंतर काही प्रश्न मात्र फार बोलके पडले आहेत मला. कोल्हापूर, सातारा असे भेट दिलेल्या जिल्ह्यात सुपीक मृदा आणि सधन जिवविविधता दिसली मात्र शेती आणि संबंधी व्यवसाय मात्र एका भयावह संकटात आहे. हे संकट म्हणजे हा पारंपरिक व्यवसाय येत्या ५०-७० वर्षा नंतर येणारी शेतकरी पिढी चालू ठेवेल कि नाही? हीच बाब लागू पडते मासेमारी करणाऱ्या पुढील पिढी च्या बाबतीत. आजची माझी नोंद आहे मुरुड, अलिबाग, पेन, पनवेल, मुंबई शहर आणि उपनगरे या सर्व जिल्हात मासेमारी करण्या बाबत तरुण पिढी फारशी उत्साहात दिसत नाही. मासेमारी आणि शेती...

Endangered Species Day 2023

Image
What is  Endangered Species Day?   Endangered Species Day is an annual observance held on the third Friday of May in the United States. It is a day dedicated to raising awareness about the importance of protecting endangered species and their habitats. The event aims to educate the public about the threats faced by endangered species and the need for conservation efforts to prevent their extinction.  The history of Endangered Species Day dates back to the early 2000s when various organizations and individuals recognized the need to raise awareness about endangered species and their conservation. The United States Senate Proclamation: Endangered Species Day was first proclaimed by the United States Senate on May 11, 2006. The resolution, introduced by Senator Dianne Feinstein, designated the third Friday of May as Endangered Species Day. The first Endangered Species Day was celebrated on May 19, 2006. It aimed to encourage people of all ages to learn about endangered spec...

Celebration of World Migratory Bird Day (WMBD) 2023

Image
  What is World Migratory Bird Day?    World Migratory Bird Day (WMBD) is an annual global campaign aimed at raising awareness about migratory birds and their conservation. It was initiated in 2006 by the Secretariat of the Agreement on the Conservation of African-Eurasian Migratory Waterbirds (AEWA) and the Convention on Migratory Species (CMS). The campaign is celebrated on the second Saturday of May and October each year. WMBD promotes the conservation of migratory birds and their habitats through various educational activities, events, and initiatives around the world.   India actively participates in World Migratory Bird Day (WMBD) celebrations and initiatives. India is known for its rich biodiversity and plays a crucial role in the conservation of migratory birds. India is home to several important bird habitats, including wetlands, national parks, and wildlife sanctuaries, which serve as crucial stopover points for migratory birds.    India is home t...
 अनुज्ञा विझता विझता स्वतःला सावरलं नाही, नाही असं नाही तगमग यांची की सर्वांना समजून घेताना, स्वतःला कोणीच समजलं नाही भीती यांची की व्यक्त करू की नको खंत मनातली, दुसऱ्याला जपण्यासाठी जर आपणच असू जबाबदार इतरांच्या दुःखासाठी, मग टाकून मोडू नांगी आत्म सन्मानाची संवेदनशीलता इतकी 'तिला' जपण्यासाठी, विझता विझता स्वतःला सावरलं नाही असं नाही पद, पैसे आणि स्वातंत्रा म्हणजे तोडू सगळी नाती, मी आणि माझं घरटं उबदार करण्यासाठी विझू लागली आहे माझ्या मनातली माया-ममतेची ज्योती, नको आता मला त्यात स्नेहल तुपाची आहुती उद्रेक होत आहे मनात शेवटी सोडून जात आहे धरती, विझता विझता स्वतःला सावरलं नाही असं  नाही 'तो' नाही रडू शकत नाही मोडू शकत, त्याला सामाजिक खोट्या 'पुरुषत्वाची' रीती अंध भक्ती आणि प्रेम स्वार्थी, कोनाड्यातला खोटा अहंकार जपण्यासाठी हरतो आहे 'तो' त्या प्रत्येक वेळी आई, पत्नी, मुलगी, मैत्रीण आणि ताई समजून घेण्यासाठी खरं सांगतो फार बरं नसतं टोकदार वळणावर, नातं थोडं आणखी चवदार करण्याची मला भीती शब्दच होतात माझ्या शेवटच्या प्रवासातले खरे सोबती, विझता विझता स्वतःला जपलं ...

माझ्या कविता

Image
प्रस्तावना: -  वाचक दोस्तहो आपल्या अवती-भवती सर्वत्र सध्या विकास कामांचा धुडगूस चालू आहे. शहर स्मार्ट आणि गावे मॉर्डन होत आहेत. परंतु यात आपण जाणीवपूर्वक रीत्या गाणारे पक्षी, भिरभिरणारी फुलपाखरे, पावसातील चिखल-मातीचा सुवास यांना दूर सारत आहोत. माझी सदर कविता  'गुलमोहर टेकडी' हि या बद्दल माझा अनुभव मांडत आहे. मला नक्कीच जाणीव आहे आपला हि असाच काहीसा वर्तमान अनुभव असेल.........       गुलमोहर टेकडी काळ्या चकचकीत डांबरी सडकेवर आजकाल दुपार फार असह्य होते   I निदान ते तरी बरं कारण शहरातील तो गुळगुळीत क्राक्रीट रोड तुलनेने अधिक आग ओकत असतो II १ II रामवाडीची ती गुलमोहर टेकडी आजकाल गुलमोहरी ला मुकली आहे  I कारण रुंदावणारा मुबंई-अलिबाग महामार्ग तिला सतत मागे सारत आहे II२II उन्हात सावली मला, तिला आणि त्याला साऱ्यांना हवीहवीशी वाटते  I पण तिची निर्मिती करणारी वृक्षराजी आम्हाला आजकाल अडचणीची ठरते II३II कोकीळ आता कधी तरीच कुहुकुहू करते, कारण किनारी असलेली अंबराई आता तिथे नाही  I नाही तिथे उरली आहेत ती चिमुकली पाणवठे नाही खळखळणार ओढा II४II चित्र फ...

समुद्र संवर्धन लेख मालिका - ४

Image
  समृद्ध कोकण आणि धगधगता विकास   कधी-कधी काही गोष्टी आपण ज्या अनुभवतो त्या बाबत जर सजगतेने विचार केला तर नक्कीच आपल्या मधील बहुतेकांना आपण फार नशीबवान आहोत याची प्रचिती नक्कीच येईल. फेब्रुवारी २०२३ चा महिना हा माझ्यासाठी याच प्रमाणे अगदी भरभरून अनुभवाचं गाठोडं देऊन गेला. जवळपास ८५०-१००० किमी इतकं अंतर, २३ दिवस आणि शेकडो माणसाच्या गाठी-भेटी, प्रदीर्घ चर्चा, कोकणचा समृद्ध समुद्र किनारा आणि रीती-भाती सोबतीला मनपसंत चवदार जेवण यांनी या संशोधन सफरीची मज्जा गडद केली. इतक्या सुंदर आठवणींना मात्र कधी-कधी  किनार लाभली भेसूर सत्याची. कोकण सुंदर आहे परंतु म्हणूनच आज ते विकास प्रकल्पाच्या आणि चुकीच्या पर्यटन धोरणांचा बळी ठरत आहे. अजून तरी आपण पुष्कळ काही करू शकतो या निसर्ग समृद्ध कोकणातील संस्कृती आणि जैवविविधता टिकवण्यासाठी. पण आज करण्याची गोष्ट उद्यावर टाकली तर मात्र हे चित्र बदलून जाईल. मग मात्र आपल्या दिसतील या कोकणात सर्वत्र  समुद्र किनारी साचलेला कचरा आणि पर्यटनाच्या नावाखाली जगोजागी उभे होत जाणारी हॉटेल व्यवस्था, मोठं मोठी तेलशुद्धी  प्रकल्प आणि अजस्त्र पोर्ट सोबतीला...
Image
  तिच्या साठी त्याची गोष्ट तो आणि ती यांची गोष्ट तशी फार जुनी,    पण तितकीच ती नवीन आहे  I एडन च्या बागेत तो आदम आणि ती इव होती,    मानवी सभ्यतेच्या सृजनाची ती वीण होती   II १ II  तो कधी पती म्हणून तीची जन्मभर सोबत करतो,   पत्नी म्हणून कधी ती आजन्म त्याला हिंमत देते  I  कधी तरी तो तिला भोग समजून उपभोगत असतो   सहनशीलतेची मूर्ती बनून ती त्याला पूजत असते   II २ II  कधी तरी तो भाऊ बनून तिच्या साठी दुनियेशी लढतो  ती मग सासरी जाताना त्याची बहीण म्हणून हंबरते I  नसते ज्याला कोणी अशी पाठराखीव बहीण त्याचं दुःख तो हरघडी पचवतो  वेड्या बहिणीची वेडी माया त्याला भाऊबीजेला रडवते   II ३ II  तो जेव्हा तिचा मित्र असतो तेव्हा मैत्री मध्ये जादूगरी विलक्षण असते  दुनियादारी कशी असो तिला माहीत असते तो तिच्या साठी मरमिटने वाला जिगरी यार आहे  I  एका मुलीची एका मुलासोबत असलेली मैत्रीची घट्ट वीण कधीच दुनिया समजत नाही म्हणूनच आज देखील भिन्न लिंगी व्यक्ती ची सहज जोडी नाही  II ४ II  तो कठोर, भांडख...
Image
  महितीपटाच्या माध्यमातून  समजुन घेऊ MPA   शाळेमध्ये विदयार्थी म्हणून असताना   “जीवो जीवस्य जीवनम्”  ह्या संकल्पनेचा आपणांस नक्कीच विज्ञानाच्या पुस्तकात परिचय झाला असेल. श्रीमद्भागवत पुराण प्रथम स्कँध, तेरावा अध्याय , श्लोक सेहचालीस मध्ये याचा उगम सापडतो. या श्लोकाचा अर्थ काय? याचा मागोवा जर आपण घेतला तर विविध तज्ञ व्यक्ती त्याचा अर्थ निरनिराळा सांगतील. परन्तु सजीवांचा परस्परांशी असलेला  जगण्यास आवश्यक सहसबंध महत्वाचा आहे ही बाब आपण विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून यातून अधोरेखित करू शकतो. जगभरात सध्या वाढत जाणारे तापमान, जागतिक हवामान बदल, आम्लीय पर्जन, वाढती वृक्ष तोड या बाबत विविध प्रसार माध्यमातून आपण नेहेमी वाचत असतो. या गोष्टी आपल्या वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रित्या परिणाम करत असतात भले आपण समुद्र किनारी राहत असो की ध्रुवीय क्षेत्रात या साऱ्या गोष्टी आपल्यावर नक्कीच परिणाम करत असतात.   नुकतीच मी अंटाआर्टिक पेनीसुला आणि प्रिस्टीन सी यांच्या नॅशनल जियोग्राफी सोबत संयुक्त सागरी मोहीम यांवर आधारित एक माहितीपट पहिला. मानवी वस्ती आणि दैनंदिन प्...