Posts

Showing posts from 2021

पुस्तके आणि गांधीजी

Image
मला उमजलेले 'गांधीजी'  काल संपूर्ण देशात गांधी जयंती निमित्त सुट्टी होती. बहुसंख्य सरकारी कार्यालये आणि काही प्रमाणात खाजगी क्षेत्रात देखील काम करणारी मंडळी घरी होती. दिवसभरात बऱ्याच मंडळी ने विविध माध्यमातून 'महात्मा गांधी' यांना स्मरून व्हाट्सअप व फेसबुक वर स्टेट्स ठेवले. काही असो एक संमिश्र भाव मी सोशल मीडियावर गांधी जयंती निमित्त अनुभवला. दिवस उतरणीला लागला आणि आणि अचानक लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, अहिंसा, इंग्रजा विरोधी लढा सोबतच नथूराम गोडसे आणि त्यांची बंदूक असे तुलना करणारे काही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालू लागले. पोस्ट करणारे काही जण परिचित होते तर बहुसंख्य अज्ञात होते.   विचार अभिव्यक्ती हि आपल्या संविधांनात दिलेली आपल्याला फार मोठी देणगी त्यामुळे आजकाल कोण काय बोलेल याचा काही नियम नाही. असो या लेखाच्या पहिल्या परिच्छेदात जे मी लिहलं त्याचे अर्थ काय असू शकतात हे सर्व सुजान भारतीयांना माहित आहेत.    २००५ मध्ये मी दहावी ची परीक्षा दिली आणि त्या सुट्टीच्या वेळी मी मामांच्या गावी न जाता टायपिंग च्या शिकवण्या केल्या. या दरम्यान सकाळी अकरा...

सागर कथा - भाग २

Image
  नारळी पौर्णिमा -  सागर पूजन ते  सागर  संवर्धन आज सकाळपासून शुभेच्छाचा वर्षाव सुरु झाला. मी एक मासेमारी समाजातील व्यक्ती आहे म्हणून माझ्या परिचयातील मंडळी आर्जवून मला 'नारळी पौर्णिमा' च्या उत्सवा निमित्त शुभ संदेश पाठवत होते. यातील एक सवांद मात्र मला जरा व्यथित करून गेला. कारण समोरली व्यक्ती फोनवर म्हणाली कि "नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आज तुमचा फार मोठा सण" मी उत्तरलो तुमचा? अहो हा सण केवळ माझा किंवा आमचा नव्हे तर या भूतळावर जगत असलेल्या समस्त मानवी सभ्यतेचा.     आपल्या येथे बहुसंख्य समाज धारणेत एक चुकीची विचार पद्धत फार प्रचुरतेने दिसून येते ती म्हणजे स्वतःला एका विशिष्ठ संकुचित विचार धारेत अडकून घेणे. समाजाला, देशालाच नव्हे तर ज्यांनी अखंड मानवी समाज रचनेला खूप काही अद्भुत असे विचार आणि प्रयोग दिले त्या 'विचारशील व्यक्ती ' ना आपण विशिष्ठ अश्या समाजासोबतच कायमचं बांधून टाकतो. त्याच बरोबरीने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या रीती, परंपरा आणि कार्यप्रणाली यांना एक तर आपण त्या त्या धर्म, जात, समाज घटक आणि विशिष्ठ प्...

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ५

Image
  वादळ वाऱ्य सुटलं गं – बॉटम ट्राल व सागरी अधिवास   कोचीन बंदरापासून काल संध्याकाळी बाहेर आलो होतो. साधारण सायंकाळी ५ वाजता बोट आम्ही किनाऱ्यावरून बाहेर काढली. मोठे जहाज आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या मार्गिकेतून फिशरी सर्व्ह ऑफ इंडिया ची बोट ‘मत्स्य वर्षणी’ जीच्यावर आम्ही स्वार होतो ती सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आम्ही नांगर टाकून स्थिर केली. साधारण केरळ राज्याची सीमा संपून कर्नाटक सुरू होतो आश्या किनारा लगत असलेल्या ठिकाणाहून आम्हाला खोल समुद्रात २१२ सागरी मैल एवढं अंतर कापायच होतं. सध्या बोट जिथे स्थिर उभी होती तिकडून उत्तर दिशेला १३०-१५० सागरी मैल एवढं अंतर तत्पूर्वी किनार्यालगत पार करण अनिर्वाय होतं. मान्सून पाऊस आणि वारा आम्हाला चांगलाच झोडपून काढत होता. १२ सागरी मैल प्रती तास वेगाने प्रवास करणारी आमची बोट या वादळ वाऱ्यात हेलकावे खात ३-४ वा ६-७ एवढंच वेग गाठू शकत होती. ती तरी काय करेल बापडी भारत सरकार च्या फिशरी सर्व्ह विभागात ४० वर्ष सेवा बाजावून ती अगदी थकून गेली होती. एवढं मात्र खरं की वार्षिक पर्यवेक्षण आणि देखफाल सातत्याने होत असल्यामुळे ती अगदी अनुभवाचे ऊन पाऊस पाह...

आनंदाचे शोध यात्री _१

Image
निसर्ग संवर्धनाचे वाटेकरी- आर्चि कार  "The desire to travel and study the flora and fauna of new regions has flowed through the veins of many naturalists going all the way back to Linnaeous"    पृष्ठ क्रमांक ६३ वर लिहलं गेलेलं हे वाक्य वाचून मला अतिशय आनंद झाला. लहान पणापासून आपण निसर्ग पाहत असतो त्याच्या सोबत खेळत बागडत असतो, परंतु निसर्गामध्ये रमणे हि बहुसंख्य मंडळींसाठी एका ठराविक वयानंतर केवळ एक आठवण बनून जाते. पण काही मंडळी या भूतळावर विविध भागात निसर्ग हाच धर्म, ध्येय आणि छंद समजून आपलं  जीवन आनंदाने भरून टाकतात. याच नि सर्ग आनंदाचे एक बीज आपल्या हृदयात पेरून जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे 'आर्चि कार' हे होत. दिनांक १६ जून १९०९ या दिनी जन्मलेल्या या व्यक्तीने  आपलं संपूर्ण जीवन निसर्ग अभ्यासणे, संशोधन व विशेष म्हणजे समुद्री कासव संवर्धन आणि लोकचळवळ या साठी समर्पित केलं. आज जगभरात निसर्ग संवर्धन विशेतः 'समुद्री कासव संवर्धन व संशोधन' व त्याच बरोबरीने या निसर्ग पूरक जीवनशैली ला साजेशी जीवन ज गणारे स्थानिक मच्छिमार समाज व त्यांना या संवर्धनात सामावून घेण्...

नभ प्रेमाचा _ माझ्या कविता

Image
  नभ प्रेमाचा  खरं आहे उधळून टाकून द्यावं लागत आयुष्य सारे प्रेम करण्यासाठी   लोकं म्हणतात तो किंवा ती प्रेमात पडली आणि पागल झालीत  पडली असं म्हणतात तेही योग्य कारण पडल्यावरचं प्रेम होत  डिग्री, संपत्ती, पद, प्रतिष्ठा आणि अंहकार ठेऊन माणसं उभी असतात  जेव्हा यांतील साऱ्या गोष्ठी गळून जातात तेव्हा तर पडतो आपण प्रेमात  !!१!! माझ्यापेक्षा कोणीतरी मला अधिक महत्वाचा वाटतो तेव्हा असतो आपण प्रेमात  मग ते प्रेम कोणावरही का असेना, चमकणाऱ्या चादण्यांवर किंवा स्वप्नातील परी वर निवडुंगाच्या उमलणाऱ्या फुलांवर किंवा शिवबां च्या गड दुर्गावर मरण स्वीकारून  सैन्यात भरती होणाऱ्या नेमणुकीवर कि तिच्या एका नजरेवर !!२!!      भित्री माणसे कधी पैज लावत नाहीत आणि पैज लावणारे कशालाही भीत नाहीत  माहित असते आपल्याला कि निकाल काय कोणाच्याही बाजूने लागू शकतो  परंतु यावर दृढ विश्वास असतो कि जिंकू तर अति नाहीतर माती  हिशोब ठेवण्यात काही अर्थ नसतो प्रेमाच्या राज्यात कारण इकडे देतो तो श्रीमंत होतो  !!३!!  आजकाल लोक फार प्रॅक्टिकल झ...

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ४

Image
                                सातपटी - मुरबे आणि पापलेट      मार्च महिन्याच्या १४ तारखेला आम्ही आमचा प्रवास सुरू केला तो अर्थात केंद्रीय समुद्री मत्सकी संशोधन संस्था कोचीन कडून महाराष्ट्राच्या दिशेन. वर्ष २०१२ मध्ये ‘भारतीय समुद्री परीक्षेत्रा अंतर्गत आढळणारे सागरी सस्तन प्राणी’ या प्रकाशित झालेल्या पुस्तका अनुसार भारतीय समुद्री क्षेत्रात सत्तावीस विविध सागरी सस्तन प्राणी असण्याची नोंद करण्यात आली आहे. या उपलब्ध संशोधन माहितीची शिदोरी घेऊन सध्या भारतीय परीक्षेत्रात आढळणारे सागरी सस्तन प्राणी याची एकूण प्रजाती विविधता आणि विपुलता समजून घेणे हाच उद्देश ठेऊन आम्ही महाराष्ट्राकडे प्रयाण केले. सुमारे ७२० किमी सागरी किनारा महाराष्ट्राला लाभला आहे या समुद्री किनाऱ्य अंतर्गत विविधतेने संपूर्ण अशी बंदरे आणि कोळीवाडे या किनाऱ्य वर डोलाने उभे आहेत.   या सागरी संशोधन सफरी अंतर्गत जे काही संशोधन होईल ते आपण सारेच काही कालावधी च्या अंतराने विविध संशोधन शोधपत्रिकेच्या लेख मालिकेच्या स्वरूपात वाचू शक...

अनुभव विश्व _ माझ्या कविता

Image
  पवित्र रमजान आणि मी     ईश्वराच्या बागेतली प्रत्येक फुलं सुंदर असतात                  कारण ती त्यांनीच निर्माण केलेली असतात   आपण म्हणतो हा छान तो वाईट, ती सुंदर आणि ती फक्त बरी           परंतु ही सारी तोकडी मापे असतात आपल्या फुटपट्टीची      डोक्यावरून ओढणी घेणारी रुबिना आणि केस मोकळे सोडलेली योजना            कानाला जान व अडकवणारा गोपाळ की चर्च मधला जॉन भाई    या साऱ्यांची नावे आपण जेव्हा पुकारतो तेव्हा आपल्याला काय आठवते?           त्यांची धर्म, जात, प्रार्थनास्थळे आणि पूजेची साधने      ईश्वराला कसे अनुभवावे यांचे नानाविधी मार्ग सारे       पण जेव्हा सुर जुळून येतात व मन एक होतात तेव्हा तो प्रकट होतो    निळे पाणी – मोकळे आकाश कधी गढूळ वा आंधरलेलं नसतं        ते कधी उजळ कधी गडद यासाठी दिसते की आपण त्याला केव्हा कसे पाहतो   ...
Image
  Mermaid of the Infinite Ocean - Sylvia Earle About 90% of the fish and aquatic life that we catch from the sea for food, about 50% of the coral reef, and much more beautiful and important marine biodiversity have been destroyed today. A very large amount of plastic is settled in the global ocean. As Social and Civilized living beings we are doing a lot of evil and harmful things to the environment. But in these challenging times, a mermaid has been studying the ocean for the last 4 decades. This is the story of her and her obsession with the sea.   This crazy journey began in 1953 when our country, India, had just been liberated from slavery. The whole world was competing to set foot on the moon. But then she jumps into the sea for the first time. Take a closer look at the ocean and then a crazy journey begins. She constantly goes deeper into the ocean and build-up a healthy friendship with the ocean. About 99% of the oceans are completely open to us today, so we have to...