Posts

Showing posts from 2019
Image
     कोंबडी आधी कि अंड आधी - कोडं जीवनिर्मितिचं शाळेत जायला लागल्या पासून एक कोडं आपल्याला नेहमीच विचारलं असेल "पहिलं काय आलं? कोंबडी कि अंडा?" आणि नेहमीच आपण या प्रश्नांची बरेच उत्तर ऐकली असतील. कोणी म्हणेल कि कोंबडी तर कोणी म्हणेल कि नाही अंड पाहिलं आला असेल. उत्तर काही असो त्या प्रत्येक उत्तराला पुन्हा तोच उलटा प्रश्न कि कोंबडी आधी अली असेल तर मग ती तर अंडयातून येते आणि जर अंड पाहिलं असेल तर ते अंड तर कोंबडी देते. बालपणी हा प्रश्न गंमतीचा असेल वा काही जणांसाठी हाच प्रश्न कुतूहलाचा असेल पण खरंच हा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.    तर सर्वंना नमस्कार, मी तुमचा दोस्त प्रदिप नामदेव चोगले पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन लेख.  मागील लेख आणि त्या लेखावर आधारित माझं युट्युब चॅनल वर आपण वाचलं असेल वा पाहिलं असेल की प्रसिद्ध पुस्तक 'लाईफ ऑन अर्थ' मधील पाहिलं प्रकरण ज्यात आपण जीवसृष्टीतील प्रचंड जीव विविधता आणि उत्क्रांती याची तोंडओळख करून घेतली या लेख मध्ये आपण एका मूलभूत प्रश्नाला समजून घेऊ तो म्हणजे ही विविधता ...
Image
'लाईफ ऑन अर्थ' एक पुस्तक परिचय  -  भाग १   खूप दिवसांनी पुन्हा मी प्रदिप नामदेव चोगले घेऊन आलो आहे हा एक आणखी छान लेख तुमच्यासाठी ज्यात आपण समजून घेणार आहोत एका मस्त पुस्तकाला. लाईफ ऑन अर्थ हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे ज्याचं लेखन केल आहे सर डेव्हिड आटेबरो यांनी ज्याला प्रकाशित केला आहे बुक क्लब असोसिएट लंडन यांनी. नुकतंच आपण या या नावाची २ री मालिका डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफी वर पहिली असेल. हे पुस्तक म्हणजे या मालिकेची १ भाग आहे. सदर पुस्तकात सुरवातीला लेखक महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्या नंतर एकूण १३ प्रकरण आहेत. या सदर लेखात आपण याची तोंड ओळख करून घेणार आहोत.   लेखक जेव्हा दक्षिण आफ्रिका च्या विमानतळावर उतरतो तेव्हा तेथील वृतीय सजीव सृष्टी पाहून स्तंभित होतात. शालेय अभ्यासक्रमात आपण कर्कवृत आणि मकरवृत याचं बद्दल वाचलं असलं. वृतीय भागात असलेलं हवेतला दमट पणा आणि घाम यांनी ते न्हाऊन जातात परंतु, जेव्हा नानाविधी वनस्पती आणि प्राणी पक्षी पाहून ते सुखावतात. या पुस्तकातील पहिलं प्रकरण आहे अनंत जैवविविधता बद्दल ज्याची सुरवात होते महान जीवव...
Image
सागर कथा~ मैफिल समाज रचनेची आणि मासेमारी   दि ३१/१०/२०१९ पासून माझा प्रवास सुरु झाला. रात्री ०९ वाजता मुबंई-चिपळूण गाडीने याची सुरुवात झाली. उलघडायचं होत सुंदर कोकण आणि तेथील लोक जीवन. सुंदर स्वच्छ समुद्री किनारे, भरभरून पसरलेला निसर्ग यांच्या सोबत होणारी मासेमारी आणि इतर सागरी दुवे यांचा अभ्यास करण्यासाठी मी हि मुसाफिरी करत होतो. यातील एक पैलु म्हणजे इकडचं समाज जीवन जवळून अनुभवणे.   १० दिवसा पूर्वीचं महाराष्ट्रात आमदारकीच्या निवडणुका पार पडल्या होत्या सर्वत्र जात आणि धर्म या आधारावर माणूस रंगा मध्ये विभागला होता. कुठे भगवा रंग अधिक भरून होता तरी कुठे निळा रंग विखुरला होता मध्येच एखादी हिरवी छटा दिसून येत होती. थोडं वाईट वाटलं की अजून हि या एवढ्या मोठ्या लोकशाही देशात जात आणि धर्म यांमध्ये होता. असो निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु जी गोष्ट मुबंई नगरीत मनाला त्रास  देत होती इथे कोकणात मात्र या बद्दल परिस्थिती वेगळी होती. प्रवासाच्या सुरवातीपासून अगदी चिपळूण ला उतरेपर्यंत या भेदाभेदाच्या सीमा विरघळून जात होत्या. मुबंई-गोवा महामार्ग म्हणजे प्रचंड खडे आणि धूळ...
Image
    अनुभूती अद्भुत सृजनाची - कैलास मंदिर आणि औरंगाबाद   काही गोष्टी अश्या असतात ज्या बद्दल आपण कितीही बोललो तरी अनुभवाशिवाय ती गोष्टी कशी हि समजू शकतच नाही. असा एक अनुभव 'याची देही याची डोळा' वेरूळ ची जैन लेणी आणि कैलास मंदिर पाहणे. खूप वेळा काही गोष्टी आपण न ठरवता अनुभवतो तसाच हा प्रवास अनुभव. साधारण वर्षभर काम केल्याचा क्षीण कमी करण्यासाठी आणि मैत्रीची गोडी वाढवणायासाठी केलेला सुंदर प्रवास.   शुक्रवारी कामाचे तास संपून रात्रीच जेवण उरकल्यावर आम्ही सर्व दोस्त एक खाजगी गाडी करून औरंगाबाद साठी मार्गस्थ झालो.  आठ तास लागतील असा अंदाज होता परंतु मुबंई पासून सुरु झालेला पाऊस आणि खराब रस्ता या कारणाने हा प्रवास १२ तास खर्च करून पूर्ण केला. सकाळची पोटपुजा करून तडक दौलताबाद चा किल्ला गाठला. १२ व्या शतकात बांधलेला हा एक अजस्त्र किल्ला यादव राजवटीची याद ताजी करतो. यादव राजवटीतील भिल्लमा-२ पासून सुरु झालेला प्रवास १५ व्या शतकापर्यंत विजापूरच्या आदिलशाही पर्यंत पोहचतो. पुढे १७ शतक उजडेपर्यंत मुघल बादशहा  औरंगजेब चे वास्तव देखील अनुभवणारी हि वास्तू. १९५१ मध्ये...
Image
अनंत चतुर्दशी - अनुभूती अनंत आनंदाची....   सर्वांना गणरायाच्या आगमनाने खूप आनंद झाला आहे, सर्वत्र उत्साह आणि प्रसन्नतेच वातावरण आहे. मोरया आपल्या घरात गेल्या १० दिवसापासून आला व आपल्या सोबत राहिला.  पाहुणचार घेऊन बाप्पा आता निघण्याच्या तयारीला आहे. "जाऊ नको रे गजानना दुःख  वाटते माझ्या मना" अशी मनाची सर्वत्र अवस्था झाली आहे. याच निमित्ताने आजचा हा लेख मी  ऐका वेगळ्या दृष्टिकोन समोर ठेऊन लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे.   आजकाल सर्वत्र भारतीय सण आणि उत्सव यांची सांगड पर्यावरण प्रदूषणाबरोबर लावली जाते. एक गट आपल्या समाजात पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर दुसरा गट या गोष्टीला टाळून उत्सवाची पारंपरिकता जपत फक्त सण साजरे करण्यावर भर देताना दिसून येतो. कोण चूक आणि कोण बरोबर असं भेद करण्यात काहीच अर्थ नाही कारण काही थोड्या बहुत मुदयांवर दोन्ही गट बरोबर असतात आणि काही बाबी बद्दल दोन्ही गटातील मंडळी  चुकीची असतात. तर मग काय आहे ही गंमत-गोष्ट मी तुम्हाला आज काही संदर्भ ग्रन्थ  आणि शोधपत्रिके च्या वरून स्पष्ट करण्याचा आपण येथे प्रयत्न करू ...
Image
पर्यावरण दिनानिमीत्ताने चिंतन - समुद्रविज्ञान     जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, माझ्या सर्व दोस्ताना आणि मला ओळखणाऱ्या सर्व मंडळींना खूप साऱ्या शुभेच्छा. माझं बालपण माझ्या आजोळी गेलं जिथे मी खुप जास्त वेळ निसर्गात रमलो. समुद्र , नदी आणि खाडी यामध्ये खुप वेळ गेला. मासेमारी हि घरचीच त्यामुळे समुद्री जीव आणि समुद्र यांची ओळख सुरवातीपासून झाली. परंतु समुद्रविज्ञान आणि प्राणीशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केल्यावर काही मजेशीर पैलुची मला ओळख झाली.   ९५% समुद्र आज हि माणसाला अज्ञात आहे. ९०% पेक्षा अधिक खाण्यायोग मोठे मासे आज आपण नष्ट केले आहेत. दररोज लाखो टन प्लास्टिक कचरा आणि इतर गोष्टी आपण समुद्रात टाकत आहोत. सूक्ष्म प्लास्टिक अन्न साखळीतून आज आपला आरोग्य प्रदूषित करत आहे. समुद्री प्रवाळ हि या भूतळावरील एक उत्तम अशी परीसंस्था आहे परंतु वातावरणात उत्सर्जित होत असणारा मोठ्या प्रमाणातील कर्बन    डायऑक्साईट महासागराच्या पाण्याची आम्लता वाढवत आहे ज्या मुले समुद्री प्रवाळ भिंतीका ठिसूळ होत आहेत व नष्ट पावत आहेत. कित्येक कवच धारी समुद्री जीवाची अवस्था अंत्यन्त बिकट...
Image
जलपरी अथांग महासागराची -  सिल्व्हिया अर्ले    जवळपास ९०% मासे आणि मत्स जीव जे आपण खाण्यासाठी म्हणून समुद्रातून पकडतो, साधारण ५०% समुद्री प्रवाळ (coral reef ) आणि आणखी बरेच काही सुंदर आणि महत्वपूर्ण अशी सागरी जैवविविधता आजच्या घडीला आपण नष्ट केली आहे. खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक समुद्रात आपलं बस्तान पसरवत आहे. खुप काही वाईट आणि पर्यावरणाला हानी पोचवणारी कृत्ये मनुष्य प्राणी राजरोस पणे करत आहे. पण या आव्हानात्मक काळात एक जलपरी गेल्या ४ दशकापासून महासागर अभ्यासत आहे. हि गोष्ट आहे तिची आणि तिच्या समुद्रवेड्या ध्यासाची.     हा ध्येय वेडा प्रवास सुरु झालं १९५३ पासून जेव्हा आपला भारत देश नुकताच गुलामीतून मुक्त झाला होता. संपूर्ण जग चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. परंतु ती तेव्हा  पहिल्यांदा समुद्रात खोल उडी मारते.  महासागराचं अंतरंग न्याहाळले आणि मग सुरु होतो एक ध्येय वेडा प्रवास. ती सतत या समुद्राच्या खोलात जाऊन आपली गट्टी आणखी घट्ट करते. जवळपास ९९% समुद्र आज संपूर्ण रित्या आपणासाठी आज खुला आहे मग आपण त्यात काही करावे म्हणजे आज त्या...
Image
The 6th of April, 2019, we all celebrated Gudi Padwa festival with great joy. But from the beginning of this new year, we have started to face many disasters from all fishing communities. The number of already decreasing fish seed stock in the sea, with ONGC being in the region of Gorai, Utan, Palghar, Vasai, the campaign for the exploration of oil reserves in the ocean and the binding on soiled fisheries, large scale development works such as the sea route ( Coastal Road).Whatever may be the reason, but it is framed today, that is the Fishery Society and our fishing. Earlier, we told many leaders and political parties our problems, but till now no questions have been received for them.Against the development work, we could never achieve a successful success. But there are so many examples of world-wide community-based conservation that a large number of forests, wetlands, slopes, or coastal creatures And with this effort, the local people could make a better alternative to the liv...
Image
दि १ मे २०१९ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन   समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ), टमर (TAMAR - IBAMA) प्रकल्प ब्राझील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे - भाग २ उजळणी :-   मागील लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच देशात इतर जी विकास कामे होत आहेत आणि त्यात जी असंख्य कोळीवाडे आणि सागरी अधिवास नष्ट होत आहेत या बद्दल समजून घेतलं. या अश्या वातावरणात आपली समुद्री उपजीविका आणि सागरी अधिवास टिकवण्यासाठी समुदाय आधारित संवर्धनाची गरज समजून घेतली. या लेखामध्ये आपण या पद्धतीचं एक यशस्वी जागतिक उदाहरण समजून घेऊ. जे उत्तम उदाहरण आहे जागतिक पातळीवर फुटबॉल मध्ये आपला नाव सोनेरी अक्षरात कोरणाऱ्या 'ब्राझील' या देशाचं. प्रस्तावना :-   जागतिक पातळीवर फार पूर्वीपासून स्थलांतरित जिवासंबंधी फार काटेकोर नियम करून त्याच रक्षण केले जात. ब्राझील मध्ये साल १९६७ पासूनच लेदरबॅक ( Dermochelys coriacea ) आणि हॅक्सबिल ( Eretmochelys imbricata  ) या सागरी कासवांना पकडण्यावर बंदी होती. या सागरी जीवांच्या रक्षणासाठी हि बंदी साल १९७९ पर्यंत आणि काही प्राण्याचं अंतर्भाव कर...
Image
  समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ) आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे- भाग १    दि ६ एप्रिल २०१९ आपण सर्वांनी खुप आनंदाने गुढीपाडवा सण साजरा केला. पण या नववर्षांच्या सुरुवातीपासून आपणं तमाम मासेमारी समाजाने कित्येक संकटाना तोंड द्याल सुरवात केली आहे. समुद्रात आधीच कमी होत जाणारी मत्स साठ्याची संख्या, त्याचं बरोबर गोराई, उत्तान, पालघर , वसई या भागात होत असलेली ONGC  ची समुद्रात तेल साठ्याची शोधासाठी होत असलेली मोहीम आणि त्यामुळे आलेली मासेमारी वर आलेली बंधन, मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे जसे की समुद्री मार्ग (Coastal Road). कारण काही असो पण यात आज भरडला जातो तो साधारण कोळी समाज आणि आपली मासेमारी. यापूर्वी आपण कित्येक नेते आणि राजकीय पक्षांना आपली समस्या सांगितली परंतु आज पर्यंत कधीच कोणत्याच प्रश्नांना योग्य दाद नाही मिळाली.   विकास कामांना विरोध करून कधीच आपण खात्रीलायक यश नाही मिळवू शकलो. परंतु जगभरात अशी कित्येक उदाहरण आहेत की जिकडे समुदाय-आधारित  संवर्धन करून खुप मोठया प्रमाणात एखाद जंगल, पाणथळ जागा, माळरान वा समुद्री कि...
      आठवणी आणि मी कित्येकांणा खुप सोप असत    आयुष्यात बरच काही विसरुण जाण हरवलेला श्वास आणि बैचेनीचा ध्यास    मंतरलेले ध्येय आणि मनाचे पाश आठवणी या आशा असतात    जणू सतत फडफडणारे झेंडे माळरानाचे कोणी येवो न येवो पाहावयला    मातीमध्ये रोवलेले आणि वाऱ्यापाशी जोडलेले डोंगरावरच्या देवळामध्ये आता रोज होते गर्दी   देवालाही माहीत आहे येथे कोणी नाही दर्दी आगरबत्तीचा पुडा आणि उद धुपाची आरती    मन हरवलेल्या माणसांची नित्याची ही खोगीरभारती संपुन जावो हा जन्म तुटो हे श्वास    आभास आता महानिद्रेचा विश्रांतीचा ध्यास स्वप्ननाच्य दुनियेवरतीअंतिम सत्याची मात    आठवणीच्या या सागराला आता देईल मी साथ                                              - प्रदिप ना चोगले टीप- २०१६ मध्ये मी हि कविते ची रचना केली.         आपली प्रतिक्रिया नकीच कळवा.
दि. ४ मार्च २०१९,   आज डॉ. आनंदी गोपाळ पहिला. समर्पण, शिक्षण आणि ध्येयवादी विचार याचं त्रिवेणी संगम आज अनुभवला. आणखी काही दिवसांनी आयुष्याचा एक नवीन पर्व सुरु होईल. माहित नाही मला कि समर्पणचा गणित मला जमेल वा नाही परंतु एक मित्र एक सोबती आणि एक छान पती म्हणून होण्याची मी भूमिका जगण्याचा प्रयत्न करेल.   स्त्री म्हणून माझ्या आयुष्यात बऱ्याच जणी येऊन नेहमी काही तरी मला भरभरून देऊन गेल्या. माझी आई, मावशी, ताई, आत्या, काकी, मामी, वहिनी, मैत्रिणी, प्रियसी आणि त्याच बरोबर काही स्त्रीया आदर्श आणि प्रेरणा घेऊन आल्या आणि स्थिरावल्या.   प्रेम, कारुण्य, त्याग, समर्पण, मैत्री, मेहनत, सुंदरता, नीटनिटकेपणा याची जाणीव मला त्यांमुळे झाली आणि आता ही होत आहे.   मी या चित्रपटाद्वारे आज जाणिपूर्वक त्या प्रत्येक 'ती' ला thank you म्हणेल जिच्या मुले माझं आयुष्य समृद्ध झालं.                                   - ( प्रदिप ना. चोगले )
Image
पुणे दि. ३ मार्च २०१९,    आज पुन्हा मुबंई-पुणे-मुबंई मुसाफिरी झाली. सोबत ती होती पण ती नव्हती . या येथे पहिली ती अर्थातच ती 'एसटी' आणि सोबत नसणारी ती अर्थातच ती ×++×. ती तशी छानच पण तिचं ते असणं आणि भान हरपून मला ती ती आहे हे जाणवलं मात्र या येथेच अर्थात पुणे १२.   आज पुन्हा मी ते शहर अनुभवलं, अंतरात साठलेल्या आठवणी पुनः एकदा ताज्या झाल्या. आज पुन्हा मी ते झाड पहिले ज्याच्याशी तिची गट्टी जमली होती. पुन्हा ते सोमेश्वरचा गाभारा अनुभवलं. दिनाचा दयाळू आणि योगीयचं आद्य गुरु असं तो भोलानाथ पुन्हा मला पाहून हसला. विचारलं की का रे अजूनही दिसते का तुला हवा आणि अजूनही तुला मातीचं गंध तितकाच भावतो का? माझं उत्तर अगदी  सरळ हो भावतो कि.   आज रात्री सुरु होणारी महाशिवरात्र माझ्यासाठी लखं प्रकाशात चालू झाली. आज पुनः वाटलं की करून टाकावी पाटी कोरी, आणि विरघळून टाकावा हे देहाचं भान . आज पुन्हा मला ती मिळाली ती, ती ताई जी अंतरीचा खजिना माझ्यासाठी मोकळं करून जाते. आज पुन्हा ती पण मिळाली ती, ती म्हणजे ती जी भोग आणि प्रेम याचं समर्पक अनुभव मला सांगून गेली.   आज पुन्हा ते ड...
Image
नाखविणीची खाडी आणि  मुबंईचा कोळी माणूस    साधारण गेल्या दीड  वर्षांपासून मी माझी  समुद्रविज्ञानचा विदयार्थी म्हणून जी भूमिका घेऊन महाराष्ट्राचा समुद्र आणि खाडी किनारे पहिले त्यांत भर म्हणून एक अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. ७२० किमी चा आपला किनारा आणि या दर्यावर अधिराज्य गाजवणारा आपला कोळी समाज. आज विविध विकास कामे मुंबईच्या समुद्रा लगत सतत चालू आहेत, पण या धामधुमीत या आपल्या समाजाला या भूमिपुत्राला हद्दपार करण्याचा कट जणू रचला जात आहे . कित्येक कोळीवाडे आणि गावठाणे आज विविध कारण सांगून संपवली जात आहेत. परंतु मुबंई आहे कोळ्यांची नाय कोणाच्या बापाची हीच गोष्ट धरून आपण आपली भूमिका मांडत आहोत. समुद्र संवर्धक  म्हणून माझी भूमिका बजावताना एक इतिहास आणि भूतकालीन तथ्य यांची सांगड घालणे हि देखील महत्वाची गोष्ट आहे.    खाडी किनाऱ्या लगत असलेल्या चिखल (Mud flat) आणि गाळ यात कित्येक समुद्री जीव आणि वनस्पती आढळून येतात या खाद्यवर अवलंबून कित्येक पक्षी आज आपल्या किनाऱ्यांवर विचरण करत असतात. ठाणे -ऐरोली फ्लेमिंगो अभयारण्य चा भाग हा असाच समुद्री जीव ...