निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग १
निळ्या देवमास्याच्या मार्गावर निळाशार पसरेलला दर्या राजा आणि त्याच्या लाटांवर हिंदोले खात कधी पुढे कधी थोडे मागे असं मार्गक्रमण करणाऱ्या कोळयांच्या बोटी असं दृश्य आपण सर्वानी पहिलं असेल. किनाऱ्यावर शांत पणे उभे राहून वा नारळी-पोकळीच्या बागेत मस्त पणे वाळूत बसून असं दृश्य पाहण हा एक नयन सुख देणारा अनुभव. परंतु याच निळ्याशार दर्या राजाच्या अंतरंगात काय काय आहे हे जर आपण अभ्यासू लागलो तर बुद्धी स्तंभित होईल अशी विविध प्रकारची जैव विविधता आणि नानाविधी नेसर्गिक साधने त्याच्या पोटात दडलेली दिसून येईल. दोस्तहो आज या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की या मासेमारी आणि जैवविविधता मध्ये असलेला सहसबंध. कश्या स्वरूपात या महासागरात विचरण करणारे अजस्त्र जीव आपल्या दैनंदिन जीव विशेष आहार- विहार सवयी प्रमाणे महासागरी अन्नसाखलीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याच बरोबर मासेमारी करताना आपण कश्या स्वरूपात सकारात्मक वा नकारात्मक रित्या या अजस्त्र जीवांवर परिणाम करतो. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील वस्त्र आणि निवारा ही गोष्ट व्यक्ति ...