दि. ४ मार्च २०१९, आज डॉ. आनंदी गोपाळ पहिला. समर्पण, शिक्षण आणि ध्येयवादी विचार याचं त्रिवेणी संगम आज अनुभवला. आणखी काही दिवसांनी आयुष्याचा एक नवीन पर्व सुरु होईल. माहित नाही मला कि समर्पणचा गणित मला जमेल वा नाही परंतु एक मित्र एक सोबती आणि एक छान पती म्हणून होण्याची मी भूमिका जगण्याचा प्रयत्न करेल. स्त्री म्हणून माझ्या आयुष्यात बऱ्याच जणी येऊन नेहमी काही तरी मला भरभरून देऊन गेल्या. माझी आई, मावशी, ताई, आत्या, काकी, मामी, वहिनी, मैत्रिणी, प्रियसी आणि त्याच बरोबर काही स्त्रीया आदर्श आणि प्रेरणा घेऊन आल्या आणि स्थिरावल्या. प्रेम, कारुण्य, त्याग, समर्पण, मैत्री, मेहनत, सुंदरता, नीटनिटकेपणा याची जाणीव मला त्यांमुळे झाली आणि आता ही होत आहे. मी या चित्रपटाद्वारे आज जाणिपूर्वक त्या प्रत्येक 'ती' ला thank you म्हणेल जिच्या मुले माझं आयुष्य समृद्ध झालं. - ( प्रदिप ना. चोगले )
Posts
- Get link
- X
- Other Apps
पुणे दि. ३ मार्च २०१९, आज पुन्हा मुबंई-पुणे-मुबंई मुसाफिरी झाली. सोबत ती होती पण ती नव्हती . या येथे पहिली ती अर्थातच ती 'एसटी' आणि सोबत नसणारी ती अर्थातच ती ×++×. ती तशी छानच पण तिचं ते असणं आणि भान हरपून मला ती ती आहे हे जाणवलं मात्र या येथेच अर्थात पुणे १२. आज पुन्हा मी ते शहर अनुभवलं, अंतरात साठलेल्या आठवणी पुनः एकदा ताज्या झाल्या. आज पुन्हा मी ते झाड पहिले ज्याच्याशी तिची गट्टी जमली होती. पुन्हा ते सोमेश्वरचा गाभारा अनुभवलं. दिनाचा दयाळू आणि योगीयचं आद्य गुरु असं तो भोलानाथ पुन्हा मला पाहून हसला. विचारलं की का रे अजूनही दिसते का तुला हवा आणि अजूनही तुला मातीचं गंध तितकाच भावतो का? माझं उत्तर अगदी सरळ हो भावतो कि. आज रात्री सुरु होणारी महाशिवरात्र माझ्यासाठी लखं प्रकाशात चालू झाली. आज पुनः वाटलं की करून टाकावी पाटी कोरी, आणि विरघळून टाकावा हे देहाचं भान . आज पुन्हा मला ती मिळाली ती, ती ताई जी अंतरीचा खजिना माझ्यासाठी मोकळं करून जाते. आज पुन्हा ती पण मिळाली ती, ती म्हणजे ती जी भोग आणि प्रेम याचं समर्पक अनुभव मला सांगून गेली. आज पुन्हा ते ड...
- Get link
- X
- Other Apps
नाखविणीची खाडी आणि मुबंईचा कोळी माणूस साधारण गेल्या दीड वर्षांपासून मी माझी समुद्रविज्ञानचा विदयार्थी म्हणून जी भूमिका घेऊन महाराष्ट्राचा समुद्र आणि खाडी किनारे पहिले त्यांत भर म्हणून एक अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. ७२० किमी चा आपला किनारा आणि या दर्यावर अधिराज्य गाजवणारा आपला कोळी समाज. आज विविध विकास कामे मुंबईच्या समुद्रा लगत सतत चालू आहेत, पण या धामधुमीत या आपल्या समाजाला या भूमिपुत्राला हद्दपार करण्याचा कट जणू रचला जात आहे . कित्येक कोळीवाडे आणि गावठाणे आज विविध कारण सांगून संपवली जात आहेत. परंतु मुबंई आहे कोळ्यांची नाय कोणाच्या बापाची हीच गोष्ट धरून आपण आपली भूमिका मांडत आहोत. समुद्र संवर्धक म्हणून माझी भूमिका बजावताना एक इतिहास आणि भूतकालीन तथ्य यांची सांगड घालणे हि देखील महत्वाची गोष्ट आहे. खाडी किनाऱ्या लगत असलेल्या चिखल (Mud flat) आणि गाळ यात कित्येक समुद्री जीव आणि वनस्पती आढळून येतात या खाद्यवर अवलंबून कित्येक पक्षी आज आपल्या किनाऱ्यांवर विचरण करत असतात. ठाणे -ऐरोली फ्लेमिंगो अभयारण्य चा भाग हा असाच समुद्री जीव ...
- Get link
- X
- Other Apps
बदलणारी मुंबई आणि चिरंतन विकास मुंबई कोळ्यांची आणि भंडाऱ्यांची अशी ओळख असलेली, सात बेटांचा समूह असलेली नारळीच्या बागा आणि आद्र दमट हवा, सुंदर समुद्रकिनारा आणि शांतता अशीच ओळख होती मुंबईची १८ व्या शतकापर्यंत. मजल दरमजल करत आपल साम्राज्य विस्तारासाठी इंग्रज साहेबानी मग या मुंबईच नामकरण बॉम्बे असं केल. परस्परांना जोडणारी बेट आणि खाड्या यावंर कुठे पुल उभारले गेले तर कुठे समुद्रात भराव टाकला गेला. सात बेटांची नगरी हळूहळू आता एका नगरात अणि मग महानगरीत रूपांतरित झाली. गोरा इंग्रजी साहेब आला आणि गेला या कालखंडात आपण कित्येक गोष्टी अनुभवल्यात. काही भाग जुलुमांचे आणि अन्यांचे होते तर काही भाग यशाचे आणि उत्कर्षाचे होते. १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली ट्रेन धावली तीही मुंबईत. गतिशील चाकाबरोबर जीवनमानाला गती आली . छोटी मोठी नगरे कोळीवाडे आणि बाजारपेठा आता स्मार्ट सिटी मोनो आणि मेट्रो यांच्यात परावर्तित घेण्यासाठी तयारी करत आहे . १९३४ मध्ये लालबाग परिसरात एका सार्वजनिक गणेशत्सव...
- Get link
- X
- Other Apps
सागर कथा ५ - समुद्री जीव आणि त्यांच्या तऱ्हा ( Oyster drill ) आज आपण एका अश्या गोष्टीला समुजून घेणार जी आपण खूप वेळा समुद्र किनार्यावर पाहतो अथवा खूप वेळा जेव्हा आपण मासे जाळ्यात पकडतो अथवा कालव किवा शिवल्या / शिंपल्या जातो तेव्हा आपण अनुभवतो. शिंपल्या अथवा आणखी काही खुबे ( Oyster / Bivalvia) यांच्या वर आपणास गोलाकार असे काही छिद्र दिसून येतात. आपण जाणून घेऊया आता या मागची गंमत आणि थोडसं समुद्रविज्ञान. विज्ञानाच्या भाषेत सांगयचा तर समुद्रात खूप सारे प्राणी राहतात ज्यांना आपण त्यांच्या विशिष्ट गुणधर्म आणि शरीर रचना यांवरून विवीध गटात ठेऊन अभ्यास केला जातो. आज या लेखामध्ये आपण ज्या प्राणी गटाला विशेष ओळख करून घेणार आहोत त्याला मृदूकाया प्राणी वा Mollusca असं म्हणतात. मृदुकाया प्राणी या गटात मोडणारे प्राणी शरीराने मृदु अर्थात नरम असतात. शरीराचे मुख्य भाग हे कठीण अश्या कवचामध्ये असतात पण क्वचित हे कठीण कवच शरीराअंतर्गत असतात. शिंपले , शिवल्या , खुब्या , माकुल , कालवं , गोगलगाय असे आपल्या परीचयाचे काही समुद्री जीव या गटात मोडतात. या प्राणी वर्गात मोडणार्या...
- Get link
- X
- Other Apps
सागरकथा ४ - अंधार प्रकाशाचा खेळ अर्थात मासेमारी आणि LED लाईट नमस्कार मित्रांनो, हि गोष्ट आहे दिनांक १ मार्च २०१८ ची दर वर्षाप्रमाणे होळी निमित्त मी गावी गेलो होतो. सर्वत्र आनंदाचा उत्साहाचं वातावरण होत. साधारण ५-६ महिन्यांपासून एक गोष्ट सतत ऐकू येत होती ती म्हणजे LED लाईटचा होणारा मासेमारीसाठी वापर आणि त्यामुळे छोट्या मासेमारी बोटीची होणारी वाताहत. गाव मजगांव तालुका मुरुड जिल्हा रायगड येथील हि घटना, साधारण ५०% पेक्षा अधिक लोक मासेमारीसाठी इतरांच्या बोटींवर खलाशी किंवा तांडेल म्हणून कामाला आहेत. जवळपासची मुरुड, एकदरा, बोर्ली, कोर्लई, नांदगाव, रेवदंडा तसेच अलिबाग, रेवस, नागाव या येथे कामानिमित्त विखुरलेली. मासेमारी संघटनांनी आणि LED विरोधात मोर्चे आणि आंदोलने केली. काही गोष्टी पूर्ण करण्यात आल्या तर काही गोष्टी आजही सरकारी कार्यलयात खितपत पडल्या आहेत. मासेमारी आणि मत्सविक्री या मध्ये असलेली जुगलबंदी काहीशी या गोष्टीनंतर पूर्ववत झाली. परंतु आता आपण समजून घेऊया काय आहे या ...
- Get link
- X
- Other Apps
ससून डॉक:- इतिहासाच्या पानांपासून आजच्या गजबजलेल्या बंदरापर्यंत मासेमारी व मासेविक्री यांना जोडणारा महत्वाचा दुवा अर्थात मासेमारीसाठी उपयुक्त ठरेल असं एखादं बंदर म्हणजेच ससून डॉक.कोणी मुंबईत आला आणि तो कुलाबा पाहावयास गेला तर तिथे त्याला मासे-मासळीचा उग्रदर्प, समुद्राची खारट हवा यांचा अनुभव मिळतोच, जिथे हे सर्व घडते ती जागा अर्थात 'ससून डॉक' माहित नाही असे होणारच नाही. तरीही मित्रांनो आपण आज हे आपलं नातं आणखी घट्ट करणार आहोत या बंदरापासून जे आपलं असं हक्काचं आहे आणि सर्वांच्या आश्रयाचं असं ससून डॉक. सात बेटांपासून जी बनली ती आपली मुंबई नगरी.विविध सात बेटे व मग त्यांना जोडणाऱ्या खाडया आणि समुद्र अशीच खूप खास ओळख १६व्या शतकापर्यंत मुंबईची जगभरात होती. कोळी आणि भंडारी हे येथील मुख्य रहिवासी असा इतिहास आहे आणि ही गोष्ट कित्येक पुस्तक आणि लेख यांच्यासह सबळ पुराव्या सोबत सिद्ध होते. साधारण १६१० पासुनच या मुंबईत एखादं मोठं ओलं बंदर असावं अशी वार्ता आणि गरज होती. परंतू ते स्वप्न सत...