Posts

Image
  समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ) आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे- भाग १    दि ६ एप्रिल २०१९ आपण सर्वांनी खुप आनंदाने गुढीपाडवा सण साजरा केला. पण या नववर्षांच्या सुरुवातीपासून आपणं तमाम मासेमारी समाजाने कित्येक संकटाना तोंड द्याल सुरवात केली आहे. समुद्रात आधीच कमी होत जाणारी मत्स साठ्याची संख्या, त्याचं बरोबर गोराई, उत्तान, पालघर , वसई या भागात होत असलेली ONGC  ची समुद्रात तेल साठ्याची शोधासाठी होत असलेली मोहीम आणि त्यामुळे आलेली मासेमारी वर आलेली बंधन, मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे जसे की समुद्री मार्ग (Coastal Road). कारण काही असो पण यात आज भरडला जातो तो साधारण कोळी समाज आणि आपली मासेमारी. यापूर्वी आपण कित्येक नेते आणि राजकीय पक्षांना आपली समस्या सांगितली परंतु आज पर्यंत कधीच कोणत्याच प्रश्नांना योग्य दाद नाही मिळाली.   विकास कामांना विरोध करून कधीच आपण खात्रीलायक यश नाही मिळवू शकलो. परंतु जगभरात अशी कित्येक उदाहरण आहेत की जिकडे समुदाय-आधारित  संवर्धन करून खुप मोठया प्रमाणात एखाद जंगल, पाणथळ जागा, माळरान वा समुद्री कि...
      आठवणी आणि मी कित्येकांणा खुप सोप असत    आयुष्यात बरच काही विसरुण जाण हरवलेला श्वास आणि बैचेनीचा ध्यास    मंतरलेले ध्येय आणि मनाचे पाश आठवणी या आशा असतात    जणू सतत फडफडणारे झेंडे माळरानाचे कोणी येवो न येवो पाहावयला    मातीमध्ये रोवलेले आणि वाऱ्यापाशी जोडलेले डोंगरावरच्या देवळामध्ये आता रोज होते गर्दी   देवालाही माहीत आहे येथे कोणी नाही दर्दी आगरबत्तीचा पुडा आणि उद धुपाची आरती    मन हरवलेल्या माणसांची नित्याची ही खोगीरभारती संपुन जावो हा जन्म तुटो हे श्वास    आभास आता महानिद्रेचा विश्रांतीचा ध्यास स्वप्ननाच्य दुनियेवरतीअंतिम सत्याची मात    आठवणीच्या या सागराला आता देईल मी साथ                                              - प्रदिप ना चोगले टीप- २०१६ मध्ये मी हि कविते ची रचना केली.         आपली प्रतिक्रिया नकीच कळवा.
दि. ४ मार्च २०१९,   आज डॉ. आनंदी गोपाळ पहिला. समर्पण, शिक्षण आणि ध्येयवादी विचार याचं त्रिवेणी संगम आज अनुभवला. आणखी काही दिवसांनी आयुष्याचा एक नवीन पर्व सुरु होईल. माहित नाही मला कि समर्पणचा गणित मला जमेल वा नाही परंतु एक मित्र एक सोबती आणि एक छान पती म्हणून होण्याची मी भूमिका जगण्याचा प्रयत्न करेल.   स्त्री म्हणून माझ्या आयुष्यात बऱ्याच जणी येऊन नेहमी काही तरी मला भरभरून देऊन गेल्या. माझी आई, मावशी, ताई, आत्या, काकी, मामी, वहिनी, मैत्रिणी, प्रियसी आणि त्याच बरोबर काही स्त्रीया आदर्श आणि प्रेरणा घेऊन आल्या आणि स्थिरावल्या.   प्रेम, कारुण्य, त्याग, समर्पण, मैत्री, मेहनत, सुंदरता, नीटनिटकेपणा याची जाणीव मला त्यांमुळे झाली आणि आता ही होत आहे.   मी या चित्रपटाद्वारे आज जाणिपूर्वक त्या प्रत्येक 'ती' ला thank you म्हणेल जिच्या मुले माझं आयुष्य समृद्ध झालं.                                   - ( प्रदिप ना. चोगले )
Image
पुणे दि. ३ मार्च २०१९,    आज पुन्हा मुबंई-पुणे-मुबंई मुसाफिरी झाली. सोबत ती होती पण ती नव्हती . या येथे पहिली ती अर्थातच ती 'एसटी' आणि सोबत नसणारी ती अर्थातच ती ×++×. ती तशी छानच पण तिचं ते असणं आणि भान हरपून मला ती ती आहे हे जाणवलं मात्र या येथेच अर्थात पुणे १२.   आज पुन्हा मी ते शहर अनुभवलं, अंतरात साठलेल्या आठवणी पुनः एकदा ताज्या झाल्या. आज पुन्हा मी ते झाड पहिले ज्याच्याशी तिची गट्टी जमली होती. पुन्हा ते सोमेश्वरचा गाभारा अनुभवलं. दिनाचा दयाळू आणि योगीयचं आद्य गुरु असं तो भोलानाथ पुन्हा मला पाहून हसला. विचारलं की का रे अजूनही दिसते का तुला हवा आणि अजूनही तुला मातीचं गंध तितकाच भावतो का? माझं उत्तर अगदी  सरळ हो भावतो कि.   आज रात्री सुरु होणारी महाशिवरात्र माझ्यासाठी लखं प्रकाशात चालू झाली. आज पुनः वाटलं की करून टाकावी पाटी कोरी, आणि विरघळून टाकावा हे देहाचं भान . आज पुन्हा मला ती मिळाली ती, ती ताई जी अंतरीचा खजिना माझ्यासाठी मोकळं करून जाते. आज पुन्हा ती पण मिळाली ती, ती म्हणजे ती जी भोग आणि प्रेम याचं समर्पक अनुभव मला सांगून गेली.   आज पुन्हा ते ड...
Image
नाखविणीची खाडी आणि  मुबंईचा कोळी माणूस    साधारण गेल्या दीड  वर्षांपासून मी माझी  समुद्रविज्ञानचा विदयार्थी म्हणून जी भूमिका घेऊन महाराष्ट्राचा समुद्र आणि खाडी किनारे पहिले त्यांत भर म्हणून एक अनुभव आज तुमच्या समोर मांडत आहे. ७२० किमी चा आपला किनारा आणि या दर्यावर अधिराज्य गाजवणारा आपला कोळी समाज. आज विविध विकास कामे मुंबईच्या समुद्रा लगत सतत चालू आहेत, पण या धामधुमीत या आपल्या समाजाला या भूमिपुत्राला हद्दपार करण्याचा कट जणू रचला जात आहे . कित्येक कोळीवाडे आणि गावठाणे आज विविध कारण सांगून संपवली जात आहेत. परंतु मुबंई आहे कोळ्यांची नाय कोणाच्या बापाची हीच गोष्ट धरून आपण आपली भूमिका मांडत आहोत. समुद्र संवर्धक  म्हणून माझी भूमिका बजावताना एक इतिहास आणि भूतकालीन तथ्य यांची सांगड घालणे हि देखील महत्वाची गोष्ट आहे.    खाडी किनाऱ्या लगत असलेल्या चिखल (Mud flat) आणि गाळ यात कित्येक समुद्री जीव आणि वनस्पती आढळून येतात या खाद्यवर अवलंबून कित्येक पक्षी आज आपल्या किनाऱ्यांवर विचरण करत असतात. ठाणे -ऐरोली फ्लेमिंगो अभयारण्य चा भाग हा असाच समुद्री जीव ...
Image
  बदलणारी मुंबई आणि चिरंतन विकास     मुंबई कोळ्यांची आणि भंडाऱ्यांची अशी ओळख असलेली,  सात बेटांचा समूह असलेली नारळीच्या बागा आणि आद्र दमट हवा,  सुंदर समुद्रकिनारा आणि शांतता अशीच ओळख होती मुंबईची १८ व्या शतकापर्यंत.  मजल दरमजल करत आपल साम्राज्य विस्तारासाठी इंग्रज साहेबानी मग या मुंबईच नामकरण बॉम्बे असं केल.   परस्परांना जोडणारी बेट आणि खाड्या यावंर कुठे पुल उभारले गेले तर कुठे समुद्रात भराव टाकला गेला. सात बेटांची नगरी हळूहळू आता एका नगरात अणि मग  महानगरीत रूपांतरित झाली. गोरा इंग्रजी साहेब आला आणि गेला या कालखंडात आपण कित्येक गोष्टी अनुभवल्यात. काही भाग जुलुमांचे आणि अन्यांचे होते तर काही भाग  यशाचे आणि उत्कर्षाचे होते.     १६ एप्रिल १८५३ मध्ये बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली ट्रेन धावली तीही मुंबईत. गतिशील चाकाबरोबर जीवनमानाला गती आली . छोटी मोठी नगरे कोळीवाडे आणि बाजारपेठा आता स्मार्ट सिटी मोनो आणि मेट्रो यांच्यात परावर्तित घेण्यासाठी तयारी करत आहे . १९३४ मध्ये लालबाग परिसरात एका सार्वजनिक गणेशत्सव...
Image
सागर कथा ५ -  समुद्री जीव आणि त्यांच्या तऱ्हा ( Oyster drill ) आज आपण एका अश्या गोष्टीला समुजून घेणार जी आपण खूप वेळा समुद्र किनार्‍यावर पाहतो अथवा खूप वेळा जेव्हा आपण मासे जाळ्यात पकडतो अथवा कालव किवा शिवल्या / शिंपल्या जातो तेव्हा आपण अनुभवतो. शिंपल्या अथवा आणखी काही खुबे ( Oyster / Bivalvia) यांच्या वर आपणास गोलाकार असे काही छिद्र दिसून येतात. आपण जाणून घेऊया आता या मागची गंमत आणि थोडसं समुद्रविज्ञान.    विज्ञानाच्या भाषेत सांगयचा तर समुद्रात खूप सारे प्राणी राहतात ज्यांना आपण त्यांच्या विशिष्ट गुणधर्म आणि शरीर रचना यांवरून विवीध गटात ठेऊन अभ्यास केला जातो. आज या लेखामध्ये आपण ज्या प्राणी गटाला विशेष ओळख करून घेणार आहोत त्याला मृदूकाया प्राणी वा Mollusca असं म्हणतात. मृदुकाया प्राणी या गटात मोडणारे प्राणी शरीराने मृदु अर्थात नरम असतात. शरीराचे मुख्य भाग हे कठीण अश्या कवचामध्ये असतात पण क्वचित हे कठीण कवच शरीराअंतर्गत असतात. शिंपले , शिवल्या , खुब्या , माकुल , कालवं , गोगलगाय असे आपल्या परीचयाचे काही समुद्री जीव या गटात मोडतात. या प्राणी वर्गात मोडणार्‍या...