Posts

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग २

Image
  लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन  ( Delphinus capensis ) जगभरात डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) ३७ प्रजाती असल्याची सागरी अभ्यासक मंडळी ने नोंद केली आहे. यातील १५ डॉल्फिन प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात विचरण करतात असा आतापर्यंत च्या सागरी निरीक्षण दरम्यान आपणांस दिसून आलं आहे. या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू.    आज आपण ज्या डॉल्फिन प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच नाव आहे लॉन्ग-बिक कॉमन डॉल्फिन यांस आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’ असं संबोधू. याचं शास्त्रीय नाव Delphinus capensis असं आहे. या डॉल्फिन प्राजतीचं वजन साधारण ७२-२२६ किलो, लांबी ६-८.५ फुट तर सरासरी ४० वर्ष इतकं त्याच आयुर्मान असतं. शरीराच्या लांबी बद्दल एक महत्वाची विशेष बाब म्हणजे या प्रजातीतील नर डॉल्फिन हे मादी डॉल्फिन च्या तुलनेने निदान ५% लांब असतात. इतर डॉल्फिन प्रजाती सोबत जर आपण या प्राजाती ची तुलना करता यांची चोच थोडी लांब असते ज्यात ४७-६७ छोटे परंतु टोकदार दात प्रत्येकी वरच्या आणि खालच्या जबड्यात असतात....

समुद्र संवर्धन लेख मालिका - ३

Image
  अजस्त्र सागरी जीव-समूह, मासेमारी आणि संवर्धन पूरक उपाययोजना वर्ष २०१९ मध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय विभागा मार्फत प्रकाशित झालेल्या एका अहवाल अनुसार भारतात ३.८ दक्षलक्ष सक्रिय मासेमार आहेत असे नमूद करण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात जर मासेमारी आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात होत असेल तर आपल्याला अंदाज येईल की किती नानाविधी प्रकारचे सागरी जीव आपल्या येथे पकडले जात असतील. मासेमारी करताना जे मासे विक्री आणि खान-पान म्हणून पकडले जातात त्यांच महत्व आणि प्रचंड आर्थिक मूल्य आहे. परंतु मासेमारी करताना काही सागरी जीव हे नकळत वा उद्देश न ठरवता पकडले जातात त्यांस उपपक्कड किंवा कुटा (Bycatch) असे म्हणतात. काही सागरी जीव ज्यात अंतर्भाव होतो आकाराने मोठे असे पाकट (Rays), मोठे मोरी मासे वा मुशी(Sharks), सागरी सस्तन प्राणी जसे की देवमासे आणि डॉल्फिन(Marine mammals), सागरी कासव(Sea turtles) आणि समुद्री पक्षी जसे की बूबी आणि समुद्री कावळे ई.(Sea Birds) यांना एका खास अश्या वैज्ञानिक शब्दावली ओळखले जाते ज्यास ‘अजस्त्र सागरी जीव-समूह’ वा मरीन मेगा फाऊना (Marine megafuna) असे म्हटले जाते. सदर लेखा...

माझ्या कविता

Image
  निरुपयोगी जीव कधी कधी आपण देवाकडे केलेला अट्टहास फारसा बरा नसतो कधी आपल्यासाठी पण बहुधा त्यांच्या साठी ज्यांवर आपण जीव ओतत असतो !!१!! वेळ हळू हळू सरत असते वाळूच्या घटिकेत झरझरणारी अगदी तसंच बहुधा काही गोष्टी सुटत असतात आपल्या हातून !!२!! योग्य वेळी हात सैल सोडणं गरजेचं असतं अबोल पणे निदान ते थोडं तरी सुखावह असतं कोणाच्या भल्यासाठी !!३!! आजकाल जास्त प्रेम, काळजी आणि आपुलकी फारशी बरी नसते जीव कोणाचा हा का कधी अगदी गुदमरून जातो या अधिम प्रेम भाराने !!४!! आपण किती निरुपयोगी आहोत या जगी ह्याची प्रचिती येते तेव्हा जेव्हा मीच मला म्हणतो बसं कर आता नाही सोसवत आता !!५!! संपू दे पाश आता या देहाचे हे देवा  सरण्या नाती या जन्माची तुटू दे हे हृदय माझे मोडण्या पाश प्रेमबंधाचे !!६!!                   ~ प्रदिप नामदेव चोगले                    दिनांक २१ ऑगस्ट २०२२                    ०१.१५ मिनिटे, मुबंई टीप:- मी त्या प्रत्येकाचा ऋणी आहे ज्यांनी मला भर...

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण - भाग १

Image
 सागरी सस्तन प्राणी परिचय  कोणाला सागरी सस्तन प्राणी म्हटल पाहिजे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण ज्या विविध सागरी आधीवासात हे जीव राहतात त्यात कमालीची भिन्नता आहे त्याच बरोबर संशोधक मंडळी ज्या गटात या प्राण्याना एकत्र करतात त्यात देखील त्यांच्या रंग-रूप व आकार यात फार मोठा भेद दिसून येतो. परंतु काही मूलभूत जीवशास्त्रीय बाबी च्या गुणधर्मा अनुरूप आपण हे समजून घेतल तर समजण नक्कीच सोप होईल.    ज्याना पाठीचा कणा आहे व असे सागरी प्राणी जे  स्वतःच्या शरीराचा तापमान नियंत्रित करू शकतात (गरम रक्ताचे प्राणी), जे फुफुसाच्या साह्याने श्वास घेऊ शकतात त्याच बरोबर जे स्वतःच्या लहान पिल्लांना दूध देतात अश्या असे सारे गुणधर्म असलेल्या प्राणी गटांना सागरी सस्तन प्राणी असे म्हणतात. सस्तन प्राणी या वर्गात (class) असलेले सागरी सस्तन प्राण्यांना मुख्यता चार गटात विभागले गेले आहेत.  १) Cetaceans (देवमासे, डॉल्फिन ई.)  २) Sirenians (समुद्री गाय)   ३) Pinnipeds (सील, सी-लायन ई.)       ४) Fissipeds (पानमांजर आणि द्रुविय अस्वल) ...

पाणथळ अधिवास संवर्धन आणि समस्या

Image
 #wetlandconservation  #maharashtra   श्रावण सरी बरसू लागल्यावर आपल्या सभोवती धरणी माता हिरवा शालू पांघरून आपणांस तिच्याकडे बोलावत असते. याच काळात छायाचित्रात दिसत आहेत असे कित्येक पाणथळ क्षेत्र आपली वाट पाहत असतात.  याच पाणथळ क्षेत्रातील एक प्रकार म्हणजे किनारी पाणथळ क्षेत्र याबद्दल अधिक वाचण्यासाठी द वायर या मराठी ई-मासिकात प्रकाशित झालेला माझा लेख सविस्तर रीत्या वाचा खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून... https://marathi.thewire.in/earth-day-and-coastal-wetlands-in-maharashtra आपली प्रतिक्रिया नक्की कळवा...

भारतातील समुद्री पक्षी _1

Image
  नकाबपोश बूबी (Masked Booby): सुदूर द्वीप और समुद्री महासागर के पक्षी सबसे अधिक संभावना है कि नर चिड़िया यौन चयन के उद्देश्य से पक्षियों के अधिकतम मामलों में मादा चिड़िया से बड़ा और सुंदर होता है ताकि वह प्रतिस्पर्धा के दौरान मादाओं तक आसानी से पहुंच सके। लेकिन पक्षियों के कुछ मामलों में मादाएं नर पक्षियों से बड़ी होती हैं, इस असामान्य घटना को रिवर्स सेक्सुअल डिमॉर्फिज्म या (आरएसडी) कहा जाता है। यहां मैं भारत से एक सुंदर और कम अध्ययन की गई समुद्री पक्षी प्रजातियों की सबसे दिलचस्प कहानियों में से एक साझा करता हूं जिसे आमतौर पर नकाबपोश बूबी (सुला डैक्टिलरिया) कहा जाता है। अधिकतम सुपरहीरो कॉमिक्स और विज्ञानकथा फिल्मों के अनुसार जब कोई भी गलत चीज होती है तो हमारे सुपरहीरो इस समस्या को हल करने के लिए कुछ आकर्षक नकाब पहने हुए वहां आते हैं। इसी तरह, जब भी आप किसी गहरे समुद्र के क्षेत्र की यात्रा करते हैं, तो आप एक बड़े सफेद रंग के पक्षी को देख सकते हैं, जिसके पास काले नुकीले पंख, एक नुकीली काली पूंछ और एक गहरे भूरे रंग का मुखौटा है। आकर्षक उड़ान पैटर्न, माता-पिता द्वारा युवा चूजे की देखभ...

डॉल्फिन आणि कविता - १

Image
किनाऱ्यावर आलेत डॉल्फिन ते उधळत असतात दर्या सागराच्या निळ्या लाटांवर कधी हळुवार, कधी वेगाने आणि कधी मस्तीने II१II  सोबत करतात त्या हींमतवाण मच्छीमाराची आणि दोस्ती करतात काही समुद्री पक्ष्यांची II२II हुशार असतात ते भारी असे विज्ञान म्हणते परंतु हुशार माणसांची लबाडी नाही कळतं त्यांना II३II म्हणूनच ते अडकून पडतात कधी जाळ्यामध्ये कधी मात्र ते शेवटचा श्वास घेतात ओल्या वाळूमध्ये II४II अजस्त्र कार्गो जहाजे त्यांची बहुधा फिकीर नाही करत म्हणूनच होते त्यांची टक्कर महासागरांवर II५II वाढणारे प्रदूषण, प्लसटीक, तेल गळती आणि लष्करी सराव माफक प्रमाणात गुन्हेगार आहेत त्यांना संपवण्यासाठी II६II मी एक बालक लहान काय करू त्यांचासाठी संशोधन, संवर्धन करेल त्यांच्या कुतुहलपोटी II७II - कवी  प्रदिप नामदेव चोगले  १०.१२.२०२१  ०१.५६ दुपार / केरळ