Posts

Image
प्राण्यांची  भाषा    आपल्या अवती भवती कित्येक असे प्राणी, पक्षी तसेच कीटक आहेत ज्यांना आपण नेहमी पाहतो. त्याचा वावर हा आपल्यासाठी काही खास कुतूहलाचा विषय नसतो, परंतु विज्ञानाच्या जगतात प्राण्याची वर्तणूक हि विशेष अशी अभ्यासाची शाखा आहे. आज आपण असे कित्येक गोष्टी प्रगत यांत्रिक गोष्टीचा वापर करत असतो ज्या या प्राण्यांकडून आपण शिकलो आहोत. मग ते मोठे पूल बांधणे असो कि महाकाय असे विमान असोत. माणूस निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टीच्या अभ्यासातून खूप काही शिकला आहे.    वर मी लिहिलेली कवीता म्हणजे माझ्या अभ्यासात असलेलं काही प्राणी जगताच्या वर्तणूक शास्त्राच्या संशोधनातील प्रश्न आणि वैज्ञानिकांना सापडलेली उत्तरे होत. गेल्या दोन वर्षात ठाणे खाडीत काम करत असताना मी कित्येक लाखो रोहित पक्षी पहिले त्याचा विणीचा हंगाम म्हणजे पक्षी निरीक्षणांची पर्वणी. तसेच गेल्या सहा महिन्यापासून कोकणात येणाऱ्या असंख्य समुद्री कासवे हा अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा विषय आहे. या सर्व गोष्टी करत असताना मी जे पहिले आणि वाचले त्या गोष्टीना मी या कवितेतून आपल्या समोर आणलं आहे.  ...
Image
मालढोक  - माळरान अधिवास आणि कविता     माळढोक ( Great Indian bustard ) या पक्ष्याचा अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट झाला आहे. शिकार आणि चुकीची संवर्धण धोरण म्हणून आज हा पक्षी महाराष्ट्रातून जवळजवळ नष्ट झाला आहे. सोप्या शब्दात या पक्ष्याच्या बदल मी येथे काही गोष्टी कवितेच्या माध्यमातून मांडल्या आहेत. आज ही आपल्या देशात कित्येक संशोधक अहोरात्र कष्ट करून या संकट ग्रस्त पक्षी प्रजातीला वाचवण्यासाठी झटत आहेत. आपणही या पक्षी जगताबद्दल विविध संशोधन पत्रिका वाचून स्वतःला परिचित करून घेऊया. माळरान अधिवास हा तसा एक दुर्लक्षित अधिवास म्हणून आपण वागतो परंतु या मध्यमातून निदान आपण जेथे आहात तेथील माळरान अधिवास संवर्धनात आणि संशोधनात जशी होईल तसा हातभार लावावा हीच विनंती.    आपणांस हि कविता आणि माझा प्रयत्न आवडल्यास आपली प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नोंदवावी.  अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेला संशोधन पत्रिकेतील लेख वाचू शकता:-  Dutta, S., Rahmani, A. R., & Jhala, Y. V. (2011). Running out of time? The great Indian bustard Arde...
Image
  जागतिक वसुंधरा दिवस      आज  २२ एप्रिल म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस या दिवसाचं  औचित्य साधून मी तुमचा मित्र घेऊन आलो आहे हि एक कविता. या धरणीला सुजलाम आणि सुफलाम करण्याचा महत्वाचं कार्य जर कोणता घटक करत असेल तो म्हणजे पाणी. या भूतलावरील खुप मोठा भाग हा पाण्याने व्याप्त आहे तो म्हणे ७८% एवढा. यात  सर्वात मोठा वाटा  आहे आपल्या महासागरी पाण्याचा  कारण पृथ्वीवर तुलनात्मक रित्या गोड्या वा पिण्याच्या पाण्याचे खूप मर्यादित साठे आहेत.    महासागरीय प्लस्टिक प्रदूषण एक मोठी समस्या आहे. या प्रदूषणामुळे जर सर्वात मोठया प्रमाणात कोणता समाज घटक तोटा  सहन करत असेल तर तो म्हणजे या दर्या राज्यावर जगणारा सागरपुत्र म्हणजे हा मासेमारी समाज.     एक समुद्र  विज्ञान शाखेचा विद्यार्थी म्हणून पण त्याच बरोबर एक मच्छिमार समाजाचा मुलगा म्हणून हि प्लँस्टीक  प्रदूषण समस्या किती  भयंकर आहे हे मी नेहमी विविध संशोधन पत्रिका आणि मासेमारी करताना पाहतो आहे. या दर्या  सागराला हा कोळी माणूस कृतज्ञता म्...
Image
जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात -२   या पृथ्वीवर जीवनाची उत्पत्ती कशी झाली आणि कधी झाली ही गोष्ट अतिशय रंजक, गुंतागुंतीची पण तितकीच उद्बोधक अशी आहे. कित्येक संशोधन पत्रिका आणि सिद्धांत या आधारावर आपण सांगू शकतो की साधारण ४.२ अब्ज वर्षा पूर्वी पृथ्वीची निर्मिती आणि जीव उत्क्रांती   पृथ्वीची निर्मिती झाली असावी, सुरवातीला एका तप्त वायूंचा गोळा अश्या अवस्थेतून हळू हळू थंड होत ती सघन होत गेली. लाखो वर्षांच्या प्रक्रियेनंतर आज आपण जी आपली पृथ्वी आज पाहतो ती झाली. आणि आज देखील आपणांस जाणवेल वा कधी- कधी जाणवणार नाही असे छोटे मोठे बदल येथे सतत घडतच आहेत. जीवरसायन विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर आपण सांगू शकतो की आज जे काही या ग्रहावर आहे ते म्हणजे येथे असलेल्या काही रासायनिक आणि जैविक घटकांमधील घडत जाणारी अत्यंत हळुवार आणि गुंतागुंतीची प्रक्रियेचा परिपाक आहे. आज आपण ज्यांना सजीव असे म्हणतो वा ज्या गोष्टींना निर्जीव असे म्हणतो त्यात जर कोणता मूलभूत फरक असेल तर ते अर्थातच त्यात असलेल्या विविध मूलद्रवांच्या अणू मधील प्रकार आणि संख्येमधील फरक इतकंच असेल. ...
Image
जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात- १ दोस्तांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे एक दन्त कथा. अहो दन्त कथा म्हणजे तुम्हाला माहित असेलच कि हि अशी गोष्ट असते जी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे सांगितली जाते. परंतु आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती खूप खास आहे कारण ही अशी दन्त कथा आहे जी अजून घडली नाही तर ती भविष्यातील कथा आहे. हि अशी गोष्ट आहे जी जरी मी एखाद्या जादूगाराप्रमाणे काही दशक आधीच सांगणार आहे. ही गोष्ट आहे तुम्हा सर्वांची माझी आणि आपल्या सर्वांची.   एक खूप सुंदर गाव असतं, खूपच सुंदर निसर्ग वैभवाने नटलेलं जेथे सुंदर पक्षी रोज गाणी गात असतात खुप गोडं गाणी. वर्षभरात बदलणाऱ्या ऋतू प्रमाणे कधी वसंता च्या अगमना बरोबर तर कधी शिशीर च्या बदलणाऱ्या रंगांबरोबर. जिथे शुभ्र धवल निर्झर खळखळ वाहताना गावाला सुजलाम सुफलाम बनवत असतात. लहान मुलं जिथे सकाळी फुलपाखरं आणि बेडूक यांच्या तालात खेळ खेळतात आणि रात्री टीम-टीमणाऱ्या काजवांच्या प्रकाशात आजी आजोबा सोबत त्यागी वीर पुरुषांच्या गोष्टी ऐकत झोपी जातात. सुपीक काळी माती जेथे सर्वांचे पोषण करत असते. सर्वच कसं अगदी आनंदी आनंद असतो. परं...

संवर्धणाची भाषा

Image
  कवितेचा  भावार्थ  :-  आज सर्वत्र आधुनिक शिक्षणा मुळे संवर्धणा ची चळवळ जोर धरत आहे ,  परंतु या इंग्रजी पाश्चिमात्य भाषेमध्ये (विचारा) सर्वच गोष्टी आज अडकल्या गेल्या आहेत. गावातील खेडूत माणसाला जरी ही भाषा अवगत नसली तरी संवर्धणा ची गोम काय हे त्याला समजते. भाषेची अडसर न ठेवता स्थानिक भाषेत जर विचार मांडले तर संवर्धण जोर धरू लागेल ही बाब या कवितेतून कवि ने मांडली आहे. POEM // Theme :- Languages // language of conservation कवी - प्रदिप नामदेव चोगले मोबाईल – ९०२९१४५१७७ ई-मेल –  pradipnc93@gmail.com कुलाबा मुंबई ०५
संवर्धणाची भाषा शाळेत शिकत होत मी   अ , आ आणि आई वेळ बदलला काळ लोटला   लागली सर्वांना विकासाची घाई II १ II लहान होतो तेव्हा चंद्र होता मामा   आणि चिव चिव करणारी चिउताई आता मोठा झालो मी फार   तेव्हा समजले चंद्र तर अप्रकाशित दगडी भार II २ II जोतिबा आणि सावित्री ने ज्ञान गंगोत्रि दावली   शिक्षणाची दारे सारी गावोगावी उघडली आता आले आहेत थ्रिजी आणि फोरजी   मुल आणि पाल्य सर्व त्याच्यातचं बिजी II ३ II ‘ भाषा ’ असते अभिव्यक्तीसाठी हे तर सर्वजण विसरलेत   माझ्या भारत भूमीत सर्व चौकटी त डांबलेत ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेंट चेंज ची सर्वत्र चर्चा सत्रे   गावचा खेडूत आजही येथे देवराई च्या विचार गात्रेत II ४ II आमची म्हातारी आज ही शेतात देशी बियाणे जपते   नको संकर पर बियांचं म्हणून मातीत ती खपते नाही भाषा त्यांना अवगत इंग्लंडच्या त्या महाराणीची   परंतु कळते नागपंचमी आणि पोळा ही व्रते चिरंतन निसर्गाची II ५ II अहो साहेब इंग्रजी बीइंग्रजी ठीक आहे जागतिकी करणासाठी    म...