Posts

समुद्र संवर्धन लेख मालिका - ४

Image
  समृद्ध कोकण आणि धगधगता विकास   कधी-कधी काही गोष्टी आपण ज्या अनुभवतो त्या बाबत जर सजगतेने विचार केला तर नक्कीच आपल्या मधील बहुतेकांना आपण फार नशीबवान आहोत याची प्रचिती नक्कीच येईल. फेब्रुवारी २०२३ चा महिना हा माझ्यासाठी याच प्रमाणे अगदी भरभरून अनुभवाचं गाठोडं देऊन गेला. जवळपास ८५०-१००० किमी इतकं अंतर, २३ दिवस आणि शेकडो माणसाच्या गाठी-भेटी, प्रदीर्घ चर्चा, कोकणचा समृद्ध समुद्र किनारा आणि रीती-भाती सोबतीला मनपसंत चवदार जेवण यांनी या संशोधन सफरीची मज्जा गडद केली. इतक्या सुंदर आठवणींना मात्र कधी-कधी  किनार लाभली भेसूर सत्याची. कोकण सुंदर आहे परंतु म्हणूनच आज ते विकास प्रकल्पाच्या आणि चुकीच्या पर्यटन धोरणांचा बळी ठरत आहे. अजून तरी आपण पुष्कळ काही करू शकतो या निसर्ग समृद्ध कोकणातील संस्कृती आणि जैवविविधता टिकवण्यासाठी. पण आज करण्याची गोष्ट उद्यावर टाकली तर मात्र हे चित्र बदलून जाईल. मग मात्र आपल्या दिसतील या कोकणात सर्वत्र  समुद्र किनारी साचलेला कचरा आणि पर्यटनाच्या नावाखाली जगोजागी उभे होत जाणारी हॉटेल व्यवस्था, मोठं मोठी तेलशुद्धी  प्रकल्प आणि अजस्त्र पोर्ट सोबतीला...
Image
  तिच्या साठी त्याची गोष्ट तो आणि ती यांची गोष्ट तशी फार जुनी,    पण तितकीच ती नवीन आहे  I एडन च्या बागेत तो आदम आणि ती इव होती,    मानवी सभ्यतेच्या सृजनाची ती वीण होती   II १ II  तो कधी पती म्हणून तीची जन्मभर सोबत करतो,   पत्नी म्हणून कधी ती आजन्म त्याला हिंमत देते  I  कधी तरी तो तिला भोग समजून उपभोगत असतो   सहनशीलतेची मूर्ती बनून ती त्याला पूजत असते   II २ II  कधी तरी तो भाऊ बनून तिच्या साठी दुनियेशी लढतो  ती मग सासरी जाताना त्याची बहीण म्हणून हंबरते I  नसते ज्याला कोणी अशी पाठराखीव बहीण त्याचं दुःख तो हरघडी पचवतो  वेड्या बहिणीची वेडी माया त्याला भाऊबीजेला रडवते   II ३ II  तो जेव्हा तिचा मित्र असतो तेव्हा मैत्री मध्ये जादूगरी विलक्षण असते  दुनियादारी कशी असो तिला माहीत असते तो तिच्या साठी मरमिटने वाला जिगरी यार आहे  I  एका मुलीची एका मुलासोबत असलेली मैत्रीची घट्ट वीण कधीच दुनिया समजत नाही म्हणूनच आज देखील भिन्न लिंगी व्यक्ती ची सहज जोडी नाही  II ४ II  तो कठोर, भांडख...
Image
  महितीपटाच्या माध्यमातून  समजुन घेऊ MPA   शाळेमध्ये विदयार्थी म्हणून असताना   “जीवो जीवस्य जीवनम्”  ह्या संकल्पनेचा आपणांस नक्कीच विज्ञानाच्या पुस्तकात परिचय झाला असेल. श्रीमद्भागवत पुराण प्रथम स्कँध, तेरावा अध्याय , श्लोक सेहचालीस मध्ये याचा उगम सापडतो. या श्लोकाचा अर्थ काय? याचा मागोवा जर आपण घेतला तर विविध तज्ञ व्यक्ती त्याचा अर्थ निरनिराळा सांगतील. परन्तु सजीवांचा परस्परांशी असलेला  जगण्यास आवश्यक सहसबंध महत्वाचा आहे ही बाब आपण विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून यातून अधोरेखित करू शकतो. जगभरात सध्या वाढत जाणारे तापमान, जागतिक हवामान बदल, आम्लीय पर्जन, वाढती वृक्ष तोड या बाबत विविध प्रसार माध्यमातून आपण नेहेमी वाचत असतो. या गोष्टी आपल्या वर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रित्या परिणाम करत असतात भले आपण समुद्र किनारी राहत असो की ध्रुवीय क्षेत्रात या साऱ्या गोष्टी आपल्यावर नक्कीच परिणाम करत असतात.   नुकतीच मी अंटाआर्टिक पेनीसुला आणि प्रिस्टीन सी यांच्या नॅशनल जियोग्राफी सोबत संयुक्त सागरी मोहीम यांवर आधारित एक माहितीपट पहिला. मानवी वस्ती आणि दैनंदिन प्...

मला उमजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विश्व

Image
    मी तेव्हा कुलाबा महानगर पालिकेच्या मराठी माध्यमाच्या तिसऱ्या इयत्तेत होतो जेव्हा सर्वांत पहिल्यांदा गौतम बुद्ध यांच्या विचार आणि कार्याची ओळख मला झाली. निमित्त होतं भाषणाच्या स्पर्धेत तिसरा आलो म्हणून मला बक्षीस म्हणून भेट दिलेलं पुस्तक. प्रसिध्द लेखिका लीला जॉर्ज यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचे ते अनुवादन होत ज्याचं शीर्षक होतं 'गौतम बुद्ध'. सोपी भाषा आणि आकर्षक रंग, चित्रे आणि पाली भाषेतली अवतरणे यांमुळे मला ते पुस्तक फार भावलं. आतापर्यंत जवळपास ५० हुन अधिक वेळेत मी त्या पुस्तकाची पारायणे केली. तेव्हा माझं वय साधारण ८-९ इतकं असेल परंतु तेव्हा देखील त्या विचारांची माझ्या मनोपटलावर पडलेली छाप आज देखील कायम आहे.   अकरावी ला असताना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रँथालयात मी पहिल्यांदा प्रवेश केला.  विज्ञान शाखेतील विदयार्थी म्हणून नियोजित शैक्षणिक पाठ्य पुस्तकांपेक्षा मला या ग्रँथालयातील पुस्तके अधिक जवळची वाटू लागली होती. तेथेच पहिल्यांदा मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्य विश्वाचा परिचय झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेख आणि भाषणे याचे महाराष्ट्र शा...

मैत्री समुद्री पक्ष्यांची

Image
  भारतीय समुद्री क्षेत्रात आकाश गमन करणारे स्थानिक आणि स्थंलांतरित समुद्री पक्षी या बाबत संशोधन करण्याचे प्रयत्न आज देखील प्राथमिक टप्प्यात आहे. त्याच बरोबर हवामान बद्दल, समुद्री प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी आणि इतर असंख्य बाबी या सागरी पक्षी विविधता आणि आधिवासा यांना नवीन आव्हाने देत आहे. समुद्री पक्षाची हि भिरभिर  वैज्ञानिक संज्ञेसह सोप्या शब्दात या कवितेच्या माध्यमातून.    मैत्री समुद्री पक्ष्यांची  कधी किनारी, कधी सागरी भिर भिर त्याची न्यारी  समुद्र पक्षी विहार करतो तुफानी दर्या लाटांना चिरुनी II १ II  आकाशा सोबत नाते त्याचे दर्या सागराशी दोस्ती जाल, वल्ही आणि बोटी गाती त्याची प्रीत गाणी II २ II  खाडी किनारी संचित झालेला चिखल-गाळ, की असो कांदळवन वाळूचे असो किनारे की कालव-शिवल्याचे खडकाळ किनारे II ३II  मुबलक दाना-पाणी आणि विणीची वस्ती स्थाने ठरतात या समुद्री पक्षी मित्राचे कधी हंगामी मुक्कामे II ४II  लाटचिरा, वादळी टीवळा आणि मोहक लाल चोच असलेली समुद्र परी ही आहे काही खास भारतीय समुद्री पक्ष्याची मांदियाळी II ५II  सोसाट्याचा वारा ...

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ३

Image
  किलर व्हेल (Orcinus orca )   महासागरात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी या विलक्षण, आकर्षक आणि सागरी परिसंस्थेच्या बाजूने महत्वपूर्ण असलेल्या प्रणी गटाचा आपण अभ्यास करायला सुरवात केली आहे. आज आपण ज्या सागरी सस्तन प्राणी प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला ‘किलर व्हेल’ किंवा Orcinus orca ‘ओरॉसीनस ओरका’ या शास्त्रीय नावाने संबोधले जाते. जरी या प्राण्याला आपण व्हेल असं संबोधन लावले असले तरी देवमासे ज्या कुळात मोडतात अश्यात यांचा समावेश होत नाही तर डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) यांचा समावेश होतो. म्हणजेच नाव जरी किलर व्हेल असंल तरी ही डॉल्फिन प्रजाती आहे. संपूर्ण डॉल्फिन कुळात आकाराने सगळ्यात मोठ्या आकाराचे डॉल्फिन म्हणून आपण यांना लक्षात ठेऊ शकतो.    वरच्या बाजूला गडद काळा आणि पोटाच्या बाजूला शुभ्र पांढरा रंग, आकाराने त्रिकोणी आणि नजरेत भरतील असे मोठे वरचे पंख ही या प्रजाती ची ओलखण्यास सोपी अशी आकर्षक शरीर रचना आणि रंगसंगती. बहुधा बऱ्याच विज्ञान प्रबोधन पूरक चित्रपटात किंवा कार्टून फिल्म मध्ये आपण यांना नक्कीच पहिल अस...

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग २

Image
  लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन  ( Delphinus capensis ) जगभरात डेल्फीनीडे वा सोप्या शब्दात बोलायचं तर डॉल्फिन या कुळात (Family) ३७ प्रजाती असल्याची सागरी अभ्यासक मंडळी ने नोंद केली आहे. यातील १५ डॉल्फिन प्रजाती आपल्या भारतीय सागरी क्षेत्रात विचरण करतात असा आतापर्यंत च्या सागरी निरीक्षण दरम्यान आपणांस दिसून आलं आहे. या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू.    आज आपण ज्या डॉल्फिन प्रजाती ला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच नाव आहे लॉन्ग-बिक कॉमन डॉल्फिन यांस आपण ‘लांब-चोचीचा सामान्य डॉल्फिन’ असं संबोधू. याचं शास्त्रीय नाव Delphinus capensis असं आहे. या डॉल्फिन प्राजतीचं वजन साधारण ७२-२२६ किलो, लांबी ६-८.५ फुट तर सरासरी ४० वर्ष इतकं त्याच आयुर्मान असतं. शरीराच्या लांबी बद्दल एक महत्वाची विशेष बाब म्हणजे या प्रजातीतील नर डॉल्फिन हे मादी डॉल्फिन च्या तुलनेने निदान ५% लांब असतात. इतर डॉल्फिन प्रजाती सोबत जर आपण या प्राजाती ची तुलना करता यांची चोच थोडी लांब असते ज्यात ४७-६७ छोटे परंतु टोकदार दात प्रत्येकी वरच्या आणि खालच्या जबड्यात असतात....