Posts

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ७

Image
ब्रूडीज व्हेल - सोबती आपल्या सागर किनारी प्रदेशाचा   अशी कोणती व्हेल प्रजाती आहे जी महाराष्ट्राच्या सागर किनारी  आणि थोडे पुढे खोल पाण्यात सगळ्यात जास्त वेळा दिसत असेल तर ती आहे 'ब्रूडीज  व्हेल'. आश्चर्य आणि चमत्कार या व्हेल बद्दल काय तर ती बऱ्याच वेळा मच्छिमार बाधंवाना मासेमारी करताना दिसते.  कधी किनारी तर  कधी  लगतच्या खोल समुद्रात , तर बऱ्याच वेळा ती सागर किनारी वाहून येते जिवंत किंवा मृत अवस्थेत.  पण तरी देखील या बद्दल आपल्या  वैज्ञानिक दृष्टिकोनातून  हवी तेवढी  माहिती आपल्या कडे अजून नाही.  आज देखील ब्रुडीज (Bryde's whale) च्या दोन उप जाती आहेत कि नाही या बद्दल थोडं  वैज्ञानिक मंडळी मध्ये देखील मतभेद आहेत. सध्या उपलब्ध संशोधन अहवाल आणि लेख या अनुसार आपण त्यांना त्यांच्या आकारवरून दोन उप जातीत विभागनी करू शकतो. आकाराने थोडी मोठी असलेली व्हेल आहे  Bryde’s whale  ( Balaenoptera   edeni   brydei ) आणि थोडी लहान असलेली  Eden’s whale (Balaenoptera edeni edeni ). यातील एङणी व्हेल बहुधा किनाऱ्या ...

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ६

Image
 अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल : संकटातील एक अद्भुत प्रजाती भाग २   आता या लेखांमध्ये आपण अरबी समुद्री हम्पबॅक व्हेल्सचा  भारतीय सागरी क्षेत्रात होत असलेल्या संशोधन कार्याचा मागोवा घेऊ या.     पॉमिला सी आणि इतर संशोधक मंडळी यांच्या 2014 मध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, अरबी समुद्रात हम्पबॅक व्हेल्सचा एक अत्यंत विशेष गट आढळला आहे - हे व्हेल्स इतर प्रवासी व्हेल्सप्रमाणे स्थलांतर करत नाहीत तर याच समुद्रात सुमारे ७०,००० वर्षे त्या अडकून पडल्या आहेत. (Pomilla et al., 2014) या व्हेल्सच्या जनुकीय अभ्यासावरून असे लक्षात आले आहे की, त्यांचे मूळ दक्षिण हिंदी महासागरातील असावे, पण ते अरबी समुद्रात अडकून त्याचे एक स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण समूह तयार झाले आहे. त्यांच्या जनुकांमध्ये अत्यंत कमी विविधता आढळली आहे, जी त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक ठरू शकते. याशिवाय, त्यांच्या डीएनएमध्ये प्राचीन आणि अलीकडील काळातील लोकसंख्येच्या घटनेची खुणाही सापडली आहे.    पॅसिव अकौस्टिक मॉनिटरिंग (PAM) ही एक अंडरवॉटर 'स्पाय नेटवर्क' सारखी आहे, जी जलचर जीवांच्या नैसर्गिक आवा...

हवामान बदल आणि मासेमारी _ १

Image
 हवामान बदलाचा (Climate change) सागरी मासेमारीवर  होणारा परिणाम: कोकणातील मासेमारी संकट   महाराष्ट्राच्या ७२० किमी लांबीच्या कोकण किनाऱ्यावरचा मासेमारी करणारा समाज पिढ्यानपिढ्या  समुद्राशी जुळवून घेत मासेमारी करत आहे. परंतु आता हवामान बदलाचा (Climate change) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षय परिणामांमुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर गंभीर प्रश्न निर्माण करत आहे. सदर लेख हा हवामान बदलाचा (Climate change) मासेमारीवर परिणाम करणाऱ्या चार प्रमुख पैलूंवर प्रकाश टाकतो माशांच्या वितरणात आणि स्थलांतरात बदल माशांच्या साठ्यात घट आणि जैवविविधतेचे नुकसान समुद्री उत्पादकतेत बदल आणि अन्नसाखळीवर परिणाम अतिवृष्टी, तुफाने आणि समुद्रपातळीवाढीचे वाढते धोके  या लेखाच्या सुरवातीला आपण समजून घेऊया हवामान बदल (Climate change) म्हणजे काय? मराठी विश्वकोश अनुसार याची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे. पृथ्वीच्या वातावरणात होत असलेले बदल, तसेच वातावरण आणि पृथ्वीच्या भूशास्त्रीय, रासायनिक, जैवभौगोलिक घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे होत असलेले बदल, या दोन्हींच्या परिणामी पृथ्वीच्या हवामान...

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ५

Image
  अरबी समुद्रातील हम्पबॅक व्हेल  : संकटातील एक अद्भुत प्रजाती   टूथड व्हेल आणि बलिन व्हेल या दोन गटातून हम्पबॅक व्हेल (Megaptera novaeangliae)  ही बलिन व्हेल या प्रकारात मोडते. बलिन व्हेल या अश्या व्हेल आहेत ज्याना तोंडात दात असण्याच्या जागी आपण केस विंचरायल जसा कंगवा वपरतो त्या प्रमाणे जाळीदार पडदे असतात ज्याने ते आपलं अन्न म्हणजे कोळंबी सदृश जीव क्रिल, छोटे मासे व प्लवक गाळून खातात. दिवसाला हा अजस्त्र जीव साधारणपणे जवळपास 1300 किलो ग्राम पर्यन्त अन्न खातो. भारतीय रस्त्यावर दिसणाऱ्या ‘मारुती स्विफ्ट’ या कार च्या वजना इतक भरेल एवढं अन्न ही व्हेल खाते असं आपणे तुलेनेण म्हणून शकतो. ह्या व्हेल मध्ये मादी व्हेल ही नरापेक्षा जवळपास १-१.५ मीटर अधिक लांब असते. यांची लांबी सर्वसाधारणपणे ११-१७ मीटर लांब असते. भारतीय रेल्वे च्या नॉन-एसी डब्याची आदर्श लांबी १२.५ मीटर इतकी असते. जर तुम्ही या सोबत कल्पना केली तर याच्या आकाराची भव्यता तुम्हाला लक्षात येईल. गमंत म्हणजे हम्पबॅक व्हेल पेक्षा देखील आकारणे, वजनाने आणि लांबी ने अधिक भरतील असे सागरी सस्तन जीव ज्यात इतर व्हेल वा मासा नसले...

भारतीय समुद्री क्षेत्रात विचरण करणारे सागरी सस्तन प्राणी आणि आपण – भाग ४

Image
  इंडो-पॅसिफिक फिनलेस पोर्पोइस   २०२१ च्या एप्रिल महिन्यात मी त्यांना प्रत्यक्षात पहिल्यांदा पहिला. अचानक काही छोटी काळी आकृती पाण्यात गुपचूप गडप झाली असं  मला दिसलं. हातात कॅमेरा आणि गळ्यात माझी लाडकी दुर्बीण होतीच , मी लगेच पुन्हा तयारी करून सज्ज झालो आणि मला त्याला माझ्या कॅमेरात  काही वेळाने टिपता आलं. जेफरसन आणि इतर संशोधक सहकारी यांच्या 'मरीन मॅमल ऑफ द वर्ल्ड' पुस्तकात वाचलेलं वर्णन आणि चित्रे याना पुन्हा आठवलं आणि मी नक्की केलं कि होय मी फिनलेस पॉरपॉइज (पोर्पोइस)  पाहिला. वेंगुर्ला बंदरापासून साधारण ५०० मीटर अंतरावर मी हि नोंद केली. सागरी सस्तन प्राणी सर्वेक्षण मोहिमेत आम्ही टीम CMFRI ने केलेली त्या वर्षाची हि पहिली नोंद.    जगभरात फोसीनिडे कुळात ज्याचा समावेश होतो अश्या सात जातीचे पॉरपॉइज समुद्रात विचरण करतात. साधारण २. ५ मीटर पेक्षा यांची लांबी कमी असते. या सर्व जातीचे पॉरपॉइज बहुधा उथळ किनारी सागरी क्षेत्रात वावरत असतात याला अपवाद म्हणजे डॅल्स पोर्पोइस आणि डोळ्याभोवती चष्म्या सारखी दिसणारी काळी वर्तुळे असलेले स्पेकट्याक्लेटेड पॉरपॉइज. या दोन्...
Image
  अनुकूलन: सागरी सस्तन प्राण्यांचे थरारक जग आणि खोल सागरातला संघर्ष    समुद्री सस्तन प्राणी पृथ्वीवरील काही अद्भुत आणि गूढ प्रजाती आहेत, ज्या अतिशय कठीण परिस्थितीतही जिवंत राहण्याची विलक्षण क्षमता दाखवतात. अंटार्क्टिकच्या बर्फाळ समुद्रांपासून खोल महासागराच्या तळापर्यंत, या प्राण्यांनी स्वतःला अशा प्रकारे विकसित केले आहे की ते अशा ठिकाणीही जिवंत राहू शकतात, जिथे इतर जीवसृष्टीला संघर्ष करावा लागतो. या लेखात, आपण समुद्री सस्तन प्राण्यांच्या भौतिक, शारीरिक आणि वर्तनात्मक वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू, ज्यामुळे ते महासागराचे खरे "सुपरहिरो" ठरतात.   आव्हानात्मक पर्यावरणातील संघर्ष यांमुळे समुद्र हा सर्वांसाठीच वावर करण्यासाठी कठीण ठरतो. समुद्री सस्तन प्राण्यांना उणे-शून्य तापमान, प्रचंड पाण्याचा दाब, कमी ऑक्सिजन आणि मर्यादित अन्नस्रोत यांचा सामना करावा लागतो. पण हे प्राणी यादरम्यान अशा प्रकारच्या युक्त्या अंगिकारतात की ज्या आपल्याला थक्क करतील.   उष्णता टिकवण्यासाठी चरबी आणि लोकरी सारखे आवरण. फ्रिजमध्ये असलेल्या थंड पाण्यासदृश्य तापमानात उष्णता टिकवण्याचे कौशल्य या प्राण्...

कल्पक चित्रपट आणि संवर्धनाचे धडे

Image
 एरिएटी, कल्पकता आणि संवर्धन    मला बाळपानापासून निसर्ग आवडतो कारण माझ्या बालपण आणि शैशव अश्याच निसर्ग रम्य ठिकाणी कुंडलिका नदीच्या किनारी, रेवदंडा-मुरुड च्या समुद्र किनारी आणि फणसाड अभयारण्य च्या कुशीत गेला. त्यामुळेच मला निसर्ग अधिक  जवळचा आणि आपुलकीचा वाटतो. ज्यांना म्हणून असं अनुभव जीवनात असेल अश्या मंडळी हा चित्रपट पाहून अधिक आनंद होईल यात काहीच नवल नाही.    जग फार वेगाने बदलत आहे त्यात 'हवामान बदल' हि संकल्पना आता फक्त पुस्तकी अभ्यासाचा भाग नाही राहिला आहे तर तो आज आपला साऱ्यांचा एक दैनंदिन अनुभव झाला आहे.  अवेळी येणार पाऊस,  कधी पिढ्यान पिढ्या अनुभवली नाही अशी थंडी आणि वाढत जाणारा  असह्य उन्हाळा हे या वातावरण बदलाचे दृश्य परिणाम. त्याच बरोबर शेतात पिकांवर येणारी प्रचंड टोळधाड, मासेमारी करताना समुद्रात मोठ्या प्रमाणात जाळ्यात अडकणारे जेलीफिश हि देशील या हवामान बदलाची चिन्हे. मग अश्यातच आपल्याला ऐकू येते कानी कि काही पक्षी प्रजाती नष्ट झाल्या आहेत तर कधी माझ्या आई-वडिलांनी खाल्लेला भाताचं वाण आता नाही राहिल आहे.  सोप्या शब्दात सांगा...