Posts

Image
अनंत चतुर्दशी - अनुभूती अनंत आनंदाची....   सर्वांना गणरायाच्या आगमनाने खूप आनंद झाला आहे, सर्वत्र उत्साह आणि प्रसन्नतेच वातावरण आहे. मोरया आपल्या घरात गेल्या १० दिवसापासून आला व आपल्या सोबत राहिला.  पाहुणचार घेऊन बाप्पा आता निघण्याच्या तयारीला आहे. "जाऊ नको रे गजानना दुःख  वाटते माझ्या मना" अशी मनाची सर्वत्र अवस्था झाली आहे. याच निमित्ताने आजचा हा लेख मी  ऐका वेगळ्या दृष्टिकोन समोर ठेऊन लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे.   आजकाल सर्वत्र भारतीय सण आणि उत्सव यांची सांगड पर्यावरण प्रदूषणाबरोबर लावली जाते. एक गट आपल्या समाजात पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर दुसरा गट या गोष्टीला टाळून उत्सवाची पारंपरिकता जपत फक्त सण साजरे करण्यावर भर देताना दिसून येतो. कोण चूक आणि कोण बरोबर असं भेद करण्यात काहीच अर्थ नाही कारण काही थोड्या बहुत मुदयांवर दोन्ही गट बरोबर असतात आणि काही बाबी बद्दल दोन्ही गटातील मंडळी  चुकीची असतात. तर मग काय आहे ही गंमत-गोष्ट मी तुम्हाला आज काही संदर्भ ग्रन्थ  आणि शोधपत्रिके च्या वरून स्पष्ट करण्याचा आपण येथे प्रयत्न करू ...
Image
पर्यावरण दिनानिमीत्ताने चिंतन - समुद्रविज्ञान     जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, माझ्या सर्व दोस्ताना आणि मला ओळखणाऱ्या सर्व मंडळींना खूप साऱ्या शुभेच्छा. माझं बालपण माझ्या आजोळी गेलं जिथे मी खुप जास्त वेळ निसर्गात रमलो. समुद्र , नदी आणि खाडी यामध्ये खुप वेळ गेला. मासेमारी हि घरचीच त्यामुळे समुद्री जीव आणि समुद्र यांची ओळख सुरवातीपासून झाली. परंतु समुद्रविज्ञान आणि प्राणीशास्त्र विषयात शिक्षण पूर्ण केल्यावर काही मजेशीर पैलुची मला ओळख झाली.   ९५% समुद्र आज हि माणसाला अज्ञात आहे. ९०% पेक्षा अधिक खाण्यायोग मोठे मासे आज आपण नष्ट केले आहेत. दररोज लाखो टन प्लास्टिक कचरा आणि इतर गोष्टी आपण समुद्रात टाकत आहोत. सूक्ष्म प्लास्टिक अन्न साखळीतून आज आपला आरोग्य प्रदूषित करत आहे. समुद्री प्रवाळ हि या भूतळावरील एक उत्तम अशी परीसंस्था आहे परंतु वातावरणात उत्सर्जित होत असणारा मोठ्या प्रमाणातील कर्बन    डायऑक्साईट महासागराच्या पाण्याची आम्लता वाढवत आहे ज्या मुले समुद्री प्रवाळ भिंतीका ठिसूळ होत आहेत व नष्ट पावत आहेत. कित्येक कवच धारी समुद्री जीवाची अवस्था अंत्यन्त बिकट...
Image
जलपरी अथांग महासागराची -  सिल्व्हिया अर्ले    जवळपास ९०% मासे आणि मत्स जीव जे आपण खाण्यासाठी म्हणून समुद्रातून पकडतो, साधारण ५०% समुद्री प्रवाळ (coral reef ) आणि आणखी बरेच काही सुंदर आणि महत्वपूर्ण अशी सागरी जैवविविधता आजच्या घडीला आपण नष्ट केली आहे. खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक समुद्रात आपलं बस्तान पसरवत आहे. खुप काही वाईट आणि पर्यावरणाला हानी पोचवणारी कृत्ये मनुष्य प्राणी राजरोस पणे करत आहे. पण या आव्हानात्मक काळात एक जलपरी गेल्या ४ दशकापासून महासागर अभ्यासत आहे. हि गोष्ट आहे तिची आणि तिच्या समुद्रवेड्या ध्यासाची.     हा ध्येय वेडा प्रवास सुरु झालं १९५३ पासून जेव्हा आपला भारत देश नुकताच गुलामीतून मुक्त झाला होता. संपूर्ण जग चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी स्पर्धा करत होते. परंतु ती तेव्हा  पहिल्यांदा समुद्रात खोल उडी मारते.  महासागराचं अंतरंग न्याहाळले आणि मग सुरु होतो एक ध्येय वेडा प्रवास. ती सतत या समुद्राच्या खोलात जाऊन आपली गट्टी आणखी घट्ट करते. जवळपास ९९% समुद्र आज संपूर्ण रित्या आपणासाठी आज खुला आहे मग आपण त्यात काही करावे म्हणजे आज त्या...
Image
The 6th of April, 2019, we all celebrated Gudi Padwa festival with great joy. But from the beginning of this new year, we have started to face many disasters from all fishing communities. The number of already decreasing fish seed stock in the sea, with ONGC being in the region of Gorai, Utan, Palghar, Vasai, the campaign for the exploration of oil reserves in the ocean and the binding on soiled fisheries, large scale development works such as the sea route ( Coastal Road).Whatever may be the reason, but it is framed today, that is the Fishery Society and our fishing. Earlier, we told many leaders and political parties our problems, but till now no questions have been received for them.Against the development work, we could never achieve a successful success. But there are so many examples of world-wide community-based conservation that a large number of forests, wetlands, slopes, or coastal creatures And with this effort, the local people could make a better alternative to the liv...
Image
दि १ मे २०१९ महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन   समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ), टमर (TAMAR - IBAMA) प्रकल्प ब्राझील आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे - भाग २ उजळणी :-   मागील लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील तसेच देशात इतर जी विकास कामे होत आहेत आणि त्यात जी असंख्य कोळीवाडे आणि सागरी अधिवास नष्ट होत आहेत या बद्दल समजून घेतलं. या अश्या वातावरणात आपली समुद्री उपजीविका आणि सागरी अधिवास टिकवण्यासाठी समुदाय आधारित संवर्धनाची गरज समजून घेतली. या लेखामध्ये आपण या पद्धतीचं एक यशस्वी जागतिक उदाहरण समजून घेऊ. जे उत्तम उदाहरण आहे जागतिक पातळीवर फुटबॉल मध्ये आपला नाव सोनेरी अक्षरात कोरणाऱ्या 'ब्राझील' या देशाचं. प्रस्तावना :-   जागतिक पातळीवर फार पूर्वीपासून स्थलांतरित जिवासंबंधी फार काटेकोर नियम करून त्याच रक्षण केले जात. ब्राझील मध्ये साल १९६७ पासूनच लेदरबॅक ( Dermochelys coriacea ) आणि हॅक्सबिल ( Eretmochelys imbricata  ) या सागरी कासवांना पकडण्यावर बंदी होती. या सागरी जीवांच्या रक्षणासाठी हि बंदी साल १९७९ पर्यंत आणि काही प्राण्याचं अंतर्भाव कर...
Image
  समुदाय-आधारित  संवर्धन (Community-based conservation ) आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे- भाग १    दि ६ एप्रिल २०१९ आपण सर्वांनी खुप आनंदाने गुढीपाडवा सण साजरा केला. पण या नववर्षांच्या सुरुवातीपासून आपणं तमाम मासेमारी समाजाने कित्येक संकटाना तोंड द्याल सुरवात केली आहे. समुद्रात आधीच कमी होत जाणारी मत्स साठ्याची संख्या, त्याचं बरोबर गोराई, उत्तान, पालघर , वसई या भागात होत असलेली ONGC  ची समुद्रात तेल साठ्याची शोधासाठी होत असलेली मोहीम आणि त्यामुळे आलेली मासेमारी वर आलेली बंधन, मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे जसे की समुद्री मार्ग (Coastal Road). कारण काही असो पण यात आज भरडला जातो तो साधारण कोळी समाज आणि आपली मासेमारी. यापूर्वी आपण कित्येक नेते आणि राजकीय पक्षांना आपली समस्या सांगितली परंतु आज पर्यंत कधीच कोणत्याच प्रश्नांना योग्य दाद नाही मिळाली.   विकास कामांना विरोध करून कधीच आपण खात्रीलायक यश नाही मिळवू शकलो. परंतु जगभरात अशी कित्येक उदाहरण आहेत की जिकडे समुदाय-आधारित  संवर्धन करून खुप मोठया प्रमाणात एखाद जंगल, पाणथळ जागा, माळरान वा समुद्री कि...
      आठवणी आणि मी कित्येकांणा खुप सोप असत    आयुष्यात बरच काही विसरुण जाण हरवलेला श्वास आणि बैचेनीचा ध्यास    मंतरलेले ध्येय आणि मनाचे पाश आठवणी या आशा असतात    जणू सतत फडफडणारे झेंडे माळरानाचे कोणी येवो न येवो पाहावयला    मातीमध्ये रोवलेले आणि वाऱ्यापाशी जोडलेले डोंगरावरच्या देवळामध्ये आता रोज होते गर्दी   देवालाही माहीत आहे येथे कोणी नाही दर्दी आगरबत्तीचा पुडा आणि उद धुपाची आरती    मन हरवलेल्या माणसांची नित्याची ही खोगीरभारती संपुन जावो हा जन्म तुटो हे श्वास    आभास आता महानिद्रेचा विश्रांतीचा ध्यास स्वप्ननाच्य दुनियेवरतीअंतिम सत्याची मात    आठवणीच्या या सागराला आता देईल मी साथ                                              - प्रदिप ना चोगले टीप- २०१६ मध्ये मी हि कविते ची रचना केली.         आपली प्रतिक्रिया नकीच कळवा.