Posts

अनपेक्षित अतिथी

Image
 केरळ मध्ये आल्या नंतर काही अनपेक्षित पक्षी पाहण्याचा योग आम्हा दोघांना लाभला. पश्चिमी घाट प्रदेशात आढळणारा व्हाइट-बेल्ड ट्रीपी ज्यास मराठी मध्ये पांढऱ्या पोटाचा टकाचोर असं म्हणतात तो हा पक्षी आणि त्याची वर्तणूक या संबंधी मी लिहिलेला हा लेख 'दैनिक अमर उजाळा' या हिंदी भाषिक वर्तमान पत्रात नुकताच प्रकाशीत झाला आहे.   मित्रहो खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही हा लेख वाचू शकता. हिंदी भाषेत लेख लिहिण्याचा माझा हा पहिला प्रयत्न आहे. नक्कीच वाचा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. https://www.amarujala.com/columns/blog/bird-watching-in-lockdown-love-and-birds-love-bird-watching-in-india?src=top-lead&pageId=1 छायाचित्र: -  John Gould (1804 – 1881)  -  Transactions of the Zoological society of London https://en.wikipedia.org/wiki/White-bellied_treepie#/media/File:DendrocittaLeucogastra.jpg

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग ३

Image
  निसर्ग निरीक्षण आणि कुतूहल   माझ्या समस्त अक्षरज्ञान असलेल्या दोस्तानो    खूप दिवस मनात एक गोष्ट घर करून होती जी मला व्यक्त करावीशी वाटत होती. ही गोष्ट आहे ‘निसर्ग निरीक्षण’ आणि ‘जिज्ञासा’ या बाबत. साधारण आज दहा दिवस झाले असतील मी कर्नाटकची सागरी सफर करून पुन्हा रोजच्या ठिकाणी ‘सागरी सस्तन प्राणी प्रयोगशाळा’ केंद्रीय सागरी मत्सकी संशोधन संस्था, केरळ येथे रुजू झालो आहे. पंधरा दिवस दर्या राज्याचे अथांग वैभव पाहून मी पुरता मंत्रमुग्ध झालो आहे. शाळा-महाविद्यालये आणि शेवटी मुंबई स्थित विज्ञान संशोधन संस्था येथील वास्तव्यात मी जे काही वाचलो, शिकलो आणि ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि जे या पंधरवड्यात पहिले ते एका बाजूला. वि. वा. शिरवाडकर लिखित ‘कोलंबस चे गर्वगीत’ ही कवीत सतत माझ्या मनात पिंगा घालत होती परंतु त्यात ही ‘नाविकाणा ना कुठली भीती’ ही ओळ खास.   समुद्राच्या लाटांवर हिंदोले खात वर खाली होणारी आमची बोट सतत पोटात जे आहे नाही त्या सगळ्या बाबी समुद्र मंथानात जसे हलाहल विष बाहेर पडते तसे हालहाल करून बाहेर काढण्याचा प्रयत्न ...

India _ way toward diversity - मला उमजलेला भारत आणि केरळ

Image
  रंग त्यांचे वेगळे, वेगळी त्यांची भाषा    भाव वेगळे सुर वेगळे , वेगळी त्यांची ऋचा  भारत भूमी असे आपली आगळी तिची कथा    विविधतेत मला सापडली तिची मंत्रमुग्ध करणारी व्यथा  II १ II नाही मला अवगत येथील मल्याळम भाषा     तरी घुमते  आजही येथे तुकाराम आणि मुक्ताई गाथा  सुर आणि संगीत हे तर जातात ओलांडून सीमाप्रांत व  भाषा     एकच नाद एकच साद सांगे 'फक्त प्रभू मी तुझ्या'  II २  II विज्ञान, साहित्य, कला आणि कल्पकता येथे चहू रंगी नाचते      दारा समोर बाग आणि घरी डार्विन-न्यूटन चालते  शिक्षण देई व्यापक डोळा त्याची नांदी येथे घुमते      स्त्री साक्षरता येथे विविध कार्यक्षेत्रात बरोबरीने चालते   II ३  II जेव्हा ओलांडतो आपण सीमा आपल्या घरं आणि दाराच्या   तेव्हा जाणीव तीव्र होते भारत सारा प्यारा था  एक देश एक ध्वज एक गान खूप खास आहे    विविधतेतली एकता हाच आपल्या राष्ट्रप्रेमाचा श्वास आहे    II ४  II    - प्रदिप नामदे...

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग २

Image
नियोजन शून्य पद्धती मुळे मासेमारी करताना जे अनावश्यक रित्या जाळ्यात पकडले जाते वा फेकले जाते अश्या सगळ्या सागरी संसाधनाचा अंतर्भाव कुटा वा Bycatch या परिभाषेत करता येईल हि गोष्ट आपण मागील लेखा मध्ये समजून घेतल्यावर आता पुढे आपण समजून घेऊ की सागरी सस्तन प्राणी (देवमासे व डॉल्फिन ई..), सागरी पक्षी आणि समुद्री कासवे याची यात काय वताहत होते.   जगभरात अथांग पसरलेल्या सागरी क्षेत्रात सात समुद्री कासव प्रजाती आढळून येतात. ऑलिव रीडले, लेदर-बॅक, सी ग्रीन, लॉगर हेड आणि हॉक्सबिल या पाच सागरी कासाव प्रजाती भारतीय मुख्य भूमी चे समुद्री किनारे, सागरी प्रदेश, मुख्य बेटे आणि खाडी तसेच नदीच्या जवळ असल्याची शास्त्रीय अभ्यास नोंदी आहेत. कॅम्प रीडले आणि फ्लॅट बॅक समुद्री कासवे याची खात्रीदायक नोंदी अजून आपल्या येथे झालेल्या नाही आहेत परंतु जगभरात इतर भागात मात्र ही समुद्री कासवे विपुलतेने आढळून येतात. समुद्री कासवे ही सागरी अधिवासात खूप महत्वाची भूमिका बजावतात. सागरी वनस्पति आणि शैवाल याचे बिजप्रसरण, पाठीचा कणा नसलेल्या कित्येक लहान मोठे सागरी जीव हे देखील फार मोठा पल्ला या कसवयांच्या मदतीने पार पाड...

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग १

Image
  निळ्या देवमास्याच्या मार्गावर     निळाशार पसरेलला दर्या राजा आणि त्याच्या लाटांवर हिंदोले खात कधी पुढे कधी थोडे मागे असं मार्गक्रमण करणाऱ्या कोळयांच्या बोटी असं दृश्य आपण सर्वानी पहिलं असेल. किनाऱ्यावर शांत पणे उभे राहून वा नारळी-पोकळीच्या बागेत मस्त पणे वाळूत बसून असं दृश्य पाहण हा एक नयन सुख देणारा अनुभव. परंतु याच निळ्याशार दर्या राजाच्या अंतरंगात काय काय आहे हे जर आपण अभ्यासू लागलो तर बुद्धी स्तंभित होईल अशी विविध प्रकारची जैव विविधता आणि नानाविधी नेसर्गिक साधने त्याच्या पोटात दडलेली दिसून येईल. दोस्तहो आज या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की या मासेमारी आणि जैवविविधता मध्ये असलेला सहसबंध. कश्या स्वरूपात या महासागरात विचरण करणारे अजस्त्र जीव आपल्या दैनंदिन जीव विशेष आहार- विहार सवयी प्रमाणे महासागरी अन्नसाखलीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याच बरोबर मासेमारी करताना आपण कश्या स्वरूपात सकारात्मक वा नकारात्मक रित्या या अजस्त्र जीवांवर परिणाम करतो.   अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील वस्त्र आणि निवारा ही गोष्ट व्यक्ति ...
Image
गणपती  बाप्पा  - एक सांस्कृतिक प्रतीक निसर्ग संवर्धकाचं    आज दिनांक २२/०८/२०२० अर्थात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच  आपली लाडकी श्रीगणेश चतुर्थी. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून जे कोरोना रुपी संकट उभ्या जगतावर चालून आले आहे त्या दुःखा पासून जणू आपणांस हे दुःखहर्ता हे नामाभिमान पूर्ण करण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आला आहे. आपण कितीही निसर्गावर मात करू अशी भाषा बोलली आणि प्रगती केली तरी आज आपणांस कळून चुकलं आहे कि निसर्ग हाच खरा गुरु आहे. एक छोटासा, डोळ्यांनी हि न दिसणारा विषाणू उभी मानव जातीची गती बंद करू शकतो यावरून आपण या निसर्गा समोर किती खुजे आहोत हे आपणांस समजून चुकले आहे.    आपण समुद्राला मागे सारून त्यात मुबंई आणि यांसारखी कित्येक महानगरे उभारली, जंगल आणि डोंगर  पोखरून महामार्ग आणि स्मार्ट सिटी वसवल्यात. नदीवर मोठाले धरण बांधून कित्येक गाव आणि  जैवविविधता संपन्न अधिवास नष्ट केले. निसर्ग हे सर्व निमूटपणे कित्येक शतके सहन करत होता. पण २०१० पासून तो आपली भूमिका मांडायला लागला. निसर्ग आपली मत व्यक्त करतो तेव्हा आपण हवालदिल हो...
Image
राम  भूत्वा  राम   यजेत प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी आणि बहुसंख्य भारतीयांसाठी सगुण  साकार रूपात अवतरलेले ईश्वरी अवतार आहेत. इतर काही  जणांसाठी ते आदर्श मनुष्य आहेत तर कोणासाठी रामप्रभू हे विविध मत आणि विचार धारणेसाठी अभ्यासन्याण्याजोगी  गूढ असा विषय  आहे. एक मात्र खरं आहे कि बहुसंख्य भारतवासियांसाठी ते एक प्रेरणा आहेत. ज्यांच्या जीवनचरीत्राच्या प्रतिबिबं स्वरूपात आपण 'रामायण' हे महाकाव्य ऐकतो, पाहतो, वाचतो अशी अदभूत चरित्र मुर्ती म्हणजे श्री राम प्रभू.    आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि त्या प्रत्येक भारतीयांसाठी   महत्वपूर्ण आहे कारण हजारो वर्षांपासून सर्वांच्या मनात वसलेल्या  प्रभू रामचंद्राचं मंदिराची आज पायाभरणीची पहिली वीट रचली जाते.    ' कृष्ण भूत्वा कृष्ण यजेत  शिवम भूत्वा शिवम यजेत राम भूत्वा  राम   यजेत  ' या नियमानुसार आपण ज्या गोष्टीच ध्यान करतो तसे होऊन जातो म्हणून आपण आज या शुभ दिनी राम चरित्राचा स्मरण करूया आणि आपल्या जीवनाला राममय बनवूया.   श्री...